Xiaomi Poco F1 च्या किंमतीत झाली 2000 रुपयांची कपात, लवकर घ्या या संधीचा लाभ

Xiaomi यावर्षीच्या सुरवातीपासूनच आपल्या स्मार्टफोन्स वर डिस्काउंट देत आहे. यातील काही स्मार्टफोनच्या किंमती कायमच्या कमी करण्यात आल्या आहेत तर काही फोनच्या किंमती तात्पुरत्या वेळेसाठी कमी करण्यात आल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून अशी माहिती येत होती कि शाओमी Poco F1 चा अपग्रेडेड वर्जन लॉन्च करू शकते. तर आता कंपनीने आपल्या Poco F1 स्मार्टफोनची किंमत मर्यादित काळासाठी कमी केली आहे. कमी झालेल्या किंमतीत Poco F1 फ्लिपकार्ट आणि मी.कॉम वर 5 ते 9 जून पर्यंत विकत घेता येईल.

शाओमी ने Poco F1 च्या किंमतीत 2,000 रुपयांची कपात केली आहे. डिस्काउंट नंतर फोनचा 6जीबी+64जीबी वेरियंट 17,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने Poco F1 च्या 6जीबी रॅम+128जीबी इंटरनल स्टोरेज आणि 8जीबी रॅम+256जीबी स्टोरेज वेरिएंट मॉडेल वर कोणताही डिस्काउंट दिला नाही.

Poco F1 स्पेसिफिकेशन्स
Poco F1 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 416पीपीआई सपोर्ट व 1080 x 2246 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर बनलेला आहे तसेच 10एनएम 2.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालेल. कपंनी ने Poco F1 लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे जो हाई ग्राफिक्स गेम व हेवी प्रोसेसिंगच्या वेळी फोन गरम होऊ देत नाही. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू मिळेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅक पॅनेल वर डुअल एलईडी फ्लॅश सोबत 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. तर सेल्फी साठी या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सोबत 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Poco F1 मध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो . फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सोबत क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here