ट्रिपल रियर कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह आला Meizu 16Xs स्मार्टफोन

चीनची स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनी Meizu ने गेल्या महिन्यात आपल्या घरच्या मार्केट मध्ये Meizu 16s लॉन्च केला होता. तसेच अनेक दिवसांपासून डिवाइसच्या दुसऱ्या वर्जन म्हणजे Meizu 16Xs माहिती समोर येत होती. आता या सर्व लीक्स व माहितीला पूर्णविराम देत कंपनीने Meizu 16Xs ऑफिशियली सादर केला आहे. Meizu 16Xs कंपनीचा नवीन मिड-रेंज स्मार्टफोन आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 600 सीरीज प्रोसेसर, नॉच-लेस डिस्प्ले, ट्रिपल रियर कॅमेरा आणि दमदार बॅटरी आहे.

Meizu 16Xs ची किंमत
चीन मध्ये MEIZU 16Xs चा 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 1,698 (जवळपास 17,150 रुपये) आणि 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 1,998 (जवळपास 20,180 रुपये) आहे. हँडसेट मिडनाइट ब्लॅक, ब्लू, कोरल ऑरेंज आणि स्लिक व्हाइट कलर ऑप्शन मध्ये 10 जूनला चीन मध्ये उपलब्ध होईल.

तसेच कंपनीने आपला टाइप-सी ईयरफोन MEIZU EP2C Type-C फोन सह सादर केला आहे. या हँडसेटची किंमत RMB 129 (जवळपास 1,300 रुपये) आहे. पण MEIZU 16Xs सह फक्त RMB 99 (जवळपास 999 रुपये) मध्ये मिळेल.

Meizu 16Xs चे स्पेसिफिकेशन्स
याच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे तर Meizu 16Xs मध्ये 6.2-इंचाचा फुल-एचडी+ अमोलेड डिस्प्ले आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच याचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 90.29 टक्के आहे. फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 SoC आणि 6जीबी रॅम सह 64जीबी/ 128जीबी ची स्टोरेज आहे.

फोटोग्राफी साठी फोनच्या मागे 48-मेगापिक्सल मेन शूटर सह 8-मेगापिक्सल+ 5-मेगापिक्सल एडिशनल स्नॅपर आहे. सोबतच मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी शूटर आहे. तसेच फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here