+92 नंबर वरून येत असेल Whatsapp कॉल तर सावध व्हा! असू शकते धोक्याची घंटी

भारतात जितक्या वेगाने इंटरनेटचा वापर वाढत आहे त्या वेगाने जगातील इतर कोणत्याही देशात वाढत नाही. गेल्या 2—3 वर्षांत भारतीयांच्या इंटरनेट वापरात अनेक पटीने वाढ झाली आहे. भारत सरकार पण डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देत आहे. इंटरनेटमुळे आज Whatsapp सारख्या इन्स्टंट मेसेंजिंग ऍपचा वापर जवळपास प्रत्येकजण करत आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या फोन मध्ये Whatsapp असतो. फक्त मेसेजच नाही तर व्हॅट्सऍप वर वीडियो व वॉयस कॉलिंगची सुविधा पण उपलब्ध आहे. परंतु Whatsapp वरून येणारा हा कॉल तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते.

Whatsapp संबंधित समोर आले आहे कि या ऍप वर मागील काही दिवसांपासून लोकांना +92 कोड वाल्या नंबर वरून कॉल येत आहेत. सर्वत आधी तुम्हाला सांगू इच्छितो कि +92 पाकिस्तानचा कंट्री कोड आहे. म्हणजे या कोड वाल्या नंबर वरून येणारे सर्व कॉल पाकिस्तान वरून येत आहेत. Whatsapp वर अशा नंबर्स वरून येणाऱ्या कॉल्स मध्ये वाढ होत आहे. आमच्याकडे पण असाच एक व्हॅट्सऍप वॉयस कॉल आला होता ज्याचा नंबर होता +92 3127513766.

पाकिस्तान मधून येणार हा कॉल एखादे मोठे संकट पण घेऊन येऊ शकते, त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

1. कॉल उचलू नका

जर तुम्हाला पण +92 कोड वाल्या एखाद्या नंबर वरून कॉल येत असेल आणि तो नंबर तुमच्या ओळखीचा नसेल तर सर्वात आधी तुम्हाला त्या कॉल कडे दुर्लक्ष करावे लागेल. अश्या नंबर वरून येणारा कॉल चुकूनही उचलू नका. रिंग वाजून जाऊ द्या किंवा कट करा. पण अजिबात उचलू नका.

2. त्या नंबर मेसेज किंवा कॉल बॅक करू नका

काही लोक कुतूहल म्हणून आपल्या फोन वर आलेल्या एखाद्या अनोळखी नंबरचा कॉल बघून त्यांच्याशी बोलू पाहतात. पण जर हा नंबर +92 कोडचा आहे त्यामुळे तुमच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. ज्या नंबर वरून कॉल आला आहे त्या नंबर वर मेसेज करून ‘who are you ?’ विचारू नका. कदाचित त्या नंबरच्या कॉन्टेट वर एखादा आकर्षक प्रोफाईल पिक्चर म्हणजे DP असेल. पण तरीही मेसेज किंवा कॉल बॅक करू नका.

3. नंबर करा ब्लॉक

तुम्ही कॉल न उचलल्यामुळे कदाचित +92 कोड वाल्या त्या नंबर वरून पुन्हा एखादा कॉल येईल किंवा पुन्हा तुम्हाला एखादा मेसेज मिळेल. त्यामुळे तुम्ही तो नंबर Whatsapp वर ब्लॉक केला तर चांगले. ब्लॉक केल्यामुळे तो नंबर पुन्हा तुम्हाला कॉन्टेक्ट करू शकणार नाही.

4. रिपोर्ट करा

Whatsapp ने ब्लॉक सोबत रिपोर्टचा फीचर पण दिला आहे. +92 कोड वाला पाकिस्तानी नंबर व्हॅट्सऍप वर रिपोर्ट करा. रिपोर्ट केल्याने Whatsapp ला समजेल कि त्या नंबर वरून एखादी चुकीची वागणूक झाली आहे, आणि व्हॅट्सऍप त्या नंबरचा तपास करेल.

5. Whatsapp ला करा मेल

जर तुम्हाला पाकिस्तानी नंबर वरून येणाऱ्या या वॉयस कॉलचे गांभीर्य समजले असेल तर एक जागृत भारतीयाच्या नात्याने हे प्रकरण Whatsapp ला ईमेल करून सांगणे आवश्यक आहे. Whatsapp च्या वेबसाइट वर जाऊन तुम्ही तुमच्यासोबत घडलेली घटना कंपनीला सांगा. तुमच्या सावधानतेमुळे इतर लोकांचा धोका कमी होईल.

आईफोन यूजर : iphone_web@support.whatsapp.com

एंडरॉयड यूजर : android_web@support.whatsapp.com

Published by
Mukesh Singh