Xiaomi Mi 11X भारतात होईल 23 एप्रिलला लॉन्च, कंपनीने केला शिक्कामोर्तब

शाओमी भारतात आपला स्मार्टफोन पोर्टफोलियो वाढवत एक नवीन डिवाइस Mi 11X भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्याची तयारी दाखवली आहे. कंपनीने अधिकृतपणे मीडिया इनवाइट पाठवून घोषणा केली आहे कि 23 एप्रिलला भारतीय बाजारात फोन सादर केला जाईल. आशा आहे कि भारतात लॉन्च होणारा मी11एक्स चीनमध्ये लॉन्च झालेल्या Redmi K40 म्हणून येईल. यापूर्वी कंपनीने रेडमी के40 ग्लोबली Poco F3 म्हणून लॉन्च केला आहे. सध्या, Xiaomi ने या फोनचे फीचर्स सार्वजनिक केले नाहीत. Mi 11X Redmi K40 / POCO F3 म्हणून लॉन्च केला जाईल त्यामुळे आम्हाला माहित आहे कि या फोनचे स्पेसिफिकेशन्स कसे असतील. (MI 11X launch date India April 23 know specification)

Redmi K40

रेडमी के40 फोन गेल्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च झाला होता आणि बोलले जात आहे कि हा ग्लोबली Poco F3 म्हणून लॉन्च होईल. Mi 11 सीरीजचा भारतीय लॉन्च होत आहे, आणि आता असे दिसत आहे कि यात Mi 11X चा पण समावेश असेल.

हे देखील वाचा : 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरीसह लॉन्च झाला स्वस्त Vivo Y20s [G] स्मार्टफोन

Mi 11X specifications

Mi 11X फोनमध्ये 6.67-inch full-HD+ (1,080×2,400 pixels) एमोलेड डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. तसेच, फोन ऑक्टाकोर Qualcomm Snapdragon 870 SoC सह 12GB पर्यंत LPDDR5 RAM सह येईल.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यात 48MP चा सोनी IMX582 प्राइमरी सेंसर असेल. तसेच 8MP ची सेकंडरी सेंसर अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा तिसरा मॅक्रो सेंसर असेल. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Moto G60 आणि Moto G40 Fusion येत आहेत भारतात, लॉन्चपूर्वी बघा यांचे पावरफुल स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 256GB UFS 3.1 स्टोरेज दिली जाऊ शकते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, NFC, Infrared (IR), आणि USB Type-C पोर्ट असतील. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण दिला जाईल. फोनमध्ये 4,520mAh बॅटरी मिळू शकतो जो 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here