25 सप्टेंबरला लॉन्च होऊ शकतो वीवो वी11, चालेल मीडियाटेक चिपसेट वर

टेक कंपनी वीवो ने भारतात आपली वी स्मार्टफोन सीरीज वाढवत कालच वीवो वी11 प्रो स्मार्टफोन लॉन्च केला आहे. वीवो चा हा पहिलाच फोन आहे जो देशात ‘वी’ शेप वाल्या नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. कंपनी ने या डिस्प्लेला हेलो नॉच नाव दिले आहे. वीवो वी11 प्रो च्या लॉन्च सोबतच कंपनी ने असे सांगितले आहे की वीवो या सीरीज मध्ये अजून एक स्मार्टफोन वी11 नावाने घेऊन येत आहे. जरी वीवो ने वी11 संबंधित कोणतीही माहिती सार्वजनिक केली नसली तरी 91मोबाईल्सला समजले आहे की वीवो वी11 स्मार्टफोन 25 सप्टेंबरला इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करण्यात येईल.

वीवो वी11 बद्दल माहिती मिळाली आहे की हा फोन वीवो वी11 प्रो चा छोटा वर्जन असेल जो बर्‍याच अंशी वीवो वी9 सारखा असेल. वीवो वी11 मध्ये पण हेलो नॉच डिस्प्ले असेल. वीवो वी11 प्रो मध्ये कंपनी ने इन-डिसप्ले फिंगर​प्रिंट सेंसर दिला आहे पण मिळालेल्या माहितीनुसार वी11 मध्ये हे फीचर मिळणार नाही. कंपनीशी संबंधीत सुत्रांनी सांगितले आहे की वीवो वी11 मध्ये इन-डिसप्ले फिंगर​प्रिंट सेंसर न देता याच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट देईल.

त्याचप्रमाणे वीवो वी11 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो पण वी11 कंपनी कडून मीडियाटेक चिपसेट सह सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये 4जीबी रॅम मेमरी तसेच 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. सूत्रांच्या मते वी11 कंपनी खासकरून टियर 3 आणि टियर 4 शहरांसाठी घेऊन येणार आहे आणि आॅनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच या फोनच्या सेलचा मेन फोकस आॅफलाईन रिटेल स्टोर्स असेल.

वीवो वी11 कंपनी 24,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत लॉन्च करू शकते. कंपनीशी संबंधीत एका व्यक्तीने आम्हाला सांगितले की वीवो चा प्राइमरी डिवाईस वी11 प्रो आहे. कंपनी वी11 प्रो च्या माध्यमातून इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये यश मिळवू पाहत आहे तर दुसरीकडे वी11 चा निर्मित स्टॉक संपवण्याच्या प्रयत्नात आहे. पण वीवो ने आता पर्यंत वी11 बद्दल आॅफिशियल माहिती दिली नाही. त्यामुळे वीवो वी11 च्या स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि लॉन्च संबंधीत माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे, जी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here