जियोफोन 2 चा दुसरा फ्लॅश सेल होत आहे सुरू, बघा कसा बुक करता येईल जियोचा 4जी फीचर फोन

रिलायंस जियो ने इंडियन मोबाईल मार्केट मध्ये आपला नवीन 4जी फीचर फोन जियोफोन 2 लॉन्च केला आहे. हा जियोफोन चा अपडेटेड वर्जन आहे जो फर्स्ट जेनरेशन जियोफोन पेक्षा खुप एडवांस आहे तसेच यात शानदार फीचर्स आहेत. रिलायंस​ जियो ने जियोफोन 2 चा पहिला फ्लॅश सेल 16 ऑगस्टला केला होता, ज्यात हा काही मिनिटांत सोल्ड आउट झाला. अनेक जियो फॅन्स जियोफोन 2 च्या आॅनलाईन सेल मध्ये निराश झाले. आपल्या त्याच फॅन्स साठी कंपनी आता जियोफोन 2 चा दुसरा फ्लॅश सेल आयोजित करत ही. हा सेल उद्या म्हणजे 30 ऑगस्ट दुपारी 12 वाजता सुरू होईल.

रिलायंस जियोच्या 4जी फीचर फोन जियोफोन 2 चा दुसरा फ्लॅश सेल 30 ऑगस्ट दुपारी 12 वाजता सुरू होईल. या फ्लॅश सेल मध्ये पण सर्व प्रक्रिया आधीच्या फ्लॅश सेल प्रमाणे करावी लागेल. जियोफोन 2 फक्त कंपनी च्या आॅफिशियल वेबसाइट जियो डॉट कॉम वरून विकत घेता येईल. पण जियो आपल्या या दुसर्‍या फ्लॅश सेल मध्ये किती यूनिट घेऊन येणार आहे याची कंपनी ने कोणतीही माहिती दिली नाही.

कशी करावी जियोफोनची बुकिंग
रिलायंस जियोफोन 2 ची बुकिंग तुम्ही कंपनी च्या वेबसाइट किंवा माय जियो अॅप मधून करू शकता. जर तुम्ही वेबसाइट वरून बुकिंग करत असाल तर तुम्हाला जियोफोन 2 फ्लॅश सेलचा बॅनर दिसेल त्यावर क्लिक करा. किंवा तुम्ही या लिंक वर क्लिक करून सरळ बुकिंग वर जाऊ शकता. 30 ऑगस्टला दुपारी 12 वाजता बुकिंग बटन एक्टिव होईल.

जर तुम्ही अॅप मधून ​बुकिंग केली तर माईजियो अॅप ओपन करताच दुसरा आॅप्शन जियोफोन 2 चा मिळेल. त्यावर क्लिक करताच नवीन विंडो उघडेल आणि तुम्ही तिथून बुकिंग करू शकता.

विशेष म्हणजे या फ्लॅश सेल साठी तुम्हाला आधी पासून रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट सेल मध्ये भाग घेऊ शकता.

कधी मिळेल फोन
कंपनी चे म्हणणे आहे की बुकिंग नंतर 5-7 दिवसांमध्ये हा फोन तुम्हाला मिळेल. पण काही ठिकाणी हा फोन उशिरा पोहोचू शकतो.

कोणते प्लान आहेत
जियोफोन 2 सोबत कंपनी ने कोणत्याही नवीन प्लानची घोषणा केली नाही. जे प्लान जियोफोन सोबत होते तेच नवीन जियोफोन 2 सोबत मिळतील. कंपनी ने फोन सोबत 3 प्लान चा उल्लेख केला आहे. पहिला प्लान 49 चा आहे ज्यात 28 दिवस 1 जीबी 4जी डाटा देण्यात येत आहे. हा इंटरनेट डेटा कोणत्याही दैनिक लिमिट विना 28 दिवस वापरता येईल. या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. तसेच 50 एसएमएएस मोफत मिळतील.

तसेच कंपनीचा दुसरा प्लान 99 रुपयांचा आहे आणि या प्लान ची वैधता 28 दिवस आहे. यात तुम्हाला 14जीबी 4जी डेटा मिळेल. या प्लान सोबत पण तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळेल आणि महिन्याला 300 एसएसएस मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here