BGMI गेम अँड्रॉइड आणि आयओएसवर कसा करायचा डाउनलोड, जाणून घ्या नवीन अपडेटची माहिती

बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया अर्थात BGMI आता भारतात डाउनलोड आणि खेळण्यासाठी उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर डेव्हलपर Krafton नं गेमसाठी 2.5 अपडेट देखील जारी केला आहे, ज्याची युजर अनेक महिने वाट बघत होते. BGMI चं नवीन व्हर्जन जुन्या व्हर्जनच्या तुलनेत थोडं वेगळं आहे. BGMI अ‍ॅप गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरून डाउनलोड करू शकता. चला जाणून घेऊया Android आणि iOS डिवाइसवर अ‍ॅप डाउनलोड करण्याची पद्धत.

BGMI गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करण्याची पद्धत

अँड्रॉइड डिवाइसवर बीजीएमआय गेम डाउनलोड करायचा असेल तर पुढील स्टेप फॉलो कराः

  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर ओपन करा आणि तिथे BGMI सर्च करा.
  • बीजीएमआय अ‍ॅपच्या खाली इंस्टॉलचा बटन दिसेल त्यावर टॅप करून अ‍ॅप डाउनलोड करू शकता.
  • गेम डाउनलोड करण्याआधी तुमच्या फोनमध्ये पुरेशी स्टोरेज आहे की नाही ते तपासलं जाईल.
  • ते झाल्यावर गेम तुमच्या डिवाइसवर डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.
  • डाउनलोड आणि इंस्टॉलेशनची प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहा.

iOS डिवाइसवर बीजीएमआय डाउनलोड करण्याची पद्धत

तुमच्या आयफोन (iPhone) किंवा आयपॅड (iPad) वर BGMI डाउनलोड करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

  • सर्वप्रथम तुमच्या आयफोन किंवा आयपॅडवर बीजीएमआय अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅपल अ‍ॅप स्टोर ओपन करा.
  • इथे सर्च बॉक्समध्ये BGMI लिहून सर्च करा. किंवा तुम्ही थेट ह्या लिंकच्या माध्यमातून देखील बीजीएमआय पेजवर जाऊ शकता.
  • त्यानंतर डाउनलोड आणि इंस्टॉलेशन प्रक्रिया सुरु करण्यासाठी इंस्टॉल बटनवर टॅप करा.
  • डिवाइसवर गेम डाउनलोड आणि इंस्टॉल होण्याची वाट पाहा.
  • एकदा इंस्टॉलेशन झाल्यावर तुम्ही सहज गेम खेळू शकता.

बीजीएमआय एपीके फाईल अँड्रॉइडवर कशी डाउनलोड करायची

जर तुम्ही एपीके फाईलच्या माध्यमातून बीजीएमआय अ‍ॅप अँड्रॉइड डिवाइसवर इंस्टॉल करू इच्छित असाल तर तर पुढील स्टेप फॉलो करा:

  • तुमच्या अँड्रॉइड डिवाइसवर वेब ब्राउजर ओपन करा.
  • एपीके फाईल डाउनलोड करण्यासाठी अधिकृत बीजीएमआय वेबसाइट किंवा एपीके मिरर सारख्या विश्वसनीय अ‍ॅप स्टोर वर जा.
  • सर्च बारमध्ये बीजीएमआय लिहून सर्च करा.
  • क्राफ्टन (Krafton) च्या अधिकृत बीजीएमआय अ‍ॅपवर क्लिक करा.
  • फाईलच्या प्रामाणिकतेसाठी अ‍ॅप डिटेल, रिव्यूज, रेटिंग इत्यादी तपासून घ्या.
  • त्यानंतर डाउनलोड किंवा इंस्टॉल बटनवर क्लिक करा.
  • डाउनलोड आणि इंस्टॉलेशनची प्रक्रिया पूर्ण होऊ द्या.
  • गेम इंस्टॉल झाल्यावर बीजीएमआय लाँच करता येईल. अकाऊंट सेटअप करून खेळण्यासाठी ऑन-स्क्रीन निर्देश पाळा.

चेक करा डिवाइस BGMI साठी रेडी आहे की नाही

बीजीएमआय अँड्रॉइड डिवाइसवर खेळायचा असेल तर डिवाइसमध्ये पुढील स्पेसिफिकेशन आवश्यक असावेत:

मोबाइल ओएस : अँड्रॉइड

व्हर्जन : Android 4.3 किंवा त्यावरील

जीपीयू : एड्रेनो (टीएम) 306 किंवा त्या वरील

रॅम : कमीत कमी 1.5 जीबी रॅम

बीजीएमआय आयओएस डिवाइसवर खळण्यासाठी डिवाइसमध्ये पुढील स्पेसिफिकेशन आवश्यक:

आयफोन: iOS 9.0 किंवा त्यानंतरचे व्हर्जन

आयपॅड: iPadOS 9.0 किंवा त्यानंतरचे व्हर्जन

आईपॉड टच: आयओएस 9.0 किंवा त्यानंतरचे व्हर्जन

रॅम: कमीत कमी 2 जीबी रॅम

बीजीएमआय डाउनलोड साइज

जर तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून नवीन बीजीएमआय गेम डाउनलोड करता तेव्हा त्याचा आकार जवळपास 960 MB असतो. गेमच्या बेसिक फीचरसाठी डिवाइसमध्ये कमीत कमी 2जीबी जागा असावी. परंतु जेव्हा तुम्ही सर्व रिसोर्स पॅक, मॅप्स, ऑडियो सेटिंग्स इत्यादी डाउनलोड करता तेव्हा डाउनलोड आकार खूप वाढतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here