108MP कॅमेऱ्यासह Mi CC9 Pro होईल 24 ऑक्टोबरला लॉन्च

चिनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने वर्षाच्या सुरवातीला CC9 सीरीज लॉन्च केली होती. या सीरीज अंतर्गत कंपनीने CC9 आणि CC9e सादर केले होते. आता एका नवीन लीक नुसार कंपनी या सीरीज मध्ये Mi CC9 Pro 24 ऑक्टोबरला लॉन्च करेल.

चीनी माइक्रोब्लॉगिंग साइट वीबो वर एका लीक वरून Mi CC9 Pro ची लॉन्च डेट आणि स्पेसिफिकेशन समजले आहेत. टिप्स्टरने दिलेल्या माहितीनुसार Mi CC9 प्रो 24 ऑक्टोबरला लॉन्च केला जाईल. तसेच या फोन मध्ये Visionox द्वारा कर्व्ड स्क्रीन डिस्प्ले असू शकतो. सोबतच डिवाइस स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेटचा वापर केला जाऊ शकतो.

Mi CC9 Pro बद्दल बोलले जात आहे कि या फोनची सर्वात मोठी खासियत याचा कॅमेरा असेल. कंपनी या फोन मध्ये 108 मेगापिक्सल ISOCELL Bright HMX कॅमेरा सेंसर देईल.

मी सीसी9 प्रो च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास फोन मध्ये सॅमसंगचा 108 मेगापिक्सल ISOCELL Bright HMX सेंसर दिला जाऊ शकतो. या सेंसर मध्ये 100 मिलियन पिक्सल देण्यात आले आहेत जे खूप जास्त ब्राइट लाईटनसल्यास पण शानदार फोटो घेऊ शकतील. Samsung द्वारा सादर केला गेलेला हा नवीन सेंसर 1/1.33-इंचाचा आहे जो जास्तीत जास्त प्रकाश गोळा करू शकतो.

ISOCELL Bright HMX मध्ये Samsung ने Tetracell टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. हि टेक्नॉलॉजी चार वेगवेगळे पिक्सल एकत्र करून काम करते आणि त्यातून कॅप्चर फोटोला एक करते. एकाच आब्जेक्ट वर चार पिक्सलने काम केल्यामुळे लो लाईट मध्ये पण फोटो चांगले येतात आणि सोबतच फोटो मध्ये नॉइज खूप कमी झाल्यामुळे वास्तूचे रंग पण चांगले कॅप्चर होतात.

तर जास्त प्रकाश असल्यास Samsung चा 108-megapixel camera sensor कंपनीच्या Smart-ISO मेकनिजम वर चालेल. जो या प्रक्रिया मध्ये ISOCELL Bright HMX प्रकाश नियंत्रित करून पिक्सल चांगले करतो. विशेष म्हणजे सॅमसंगचा हा नवीन सेंसर 6016 x 3384 पिक्सल रेज्ल्यूशन वर 6K वीडियो बनवू शकतो. तसेच हा सेंसर 30 fps (फ्रेम वर सेकेंड) च्या स्पीडने शूटिंग करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here