Micromax In 1 स्मार्टफोन 19 मार्चला भारतीय बाजारात लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. फोन लॉन्चसाठी काही दिवस बाकी आहेत, पण यासंदर्भात माहिती समोर येऊ लागली आहे. या फोनची आतुरतेने वाट पाहत असलेल्या लोकांसाठी एक नवीन बातमी समोर आली आहे. फोन गीकबेंचवर स्पॉट केला गेला आहे जिथे फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. तसेच या लिस्टिंगपूर्वी हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर लिस्ट झाला आहे जिथे स्मार्टफोनची डिजाइन दिसली होती.
गीकबेंच लिस्टिंग
Geekbench 5 लिस्टिंगनुसार माइक्रोमॅक्स In 1 MT6769V/CT SoC सह सादर केला जाईल जो Helio G80 नावाची एक बजेट गेमिंग एसओसी आहे. इतकेच नव्हे तर फोनमध्ये 6GB रॅम पण दिला जाईल. त्याचबरोबर गीकबेंच लिस्टिंगमध्ये सिंगल-कोर आणि मल्टीर कोर मध्ये स्कोर क्रमश: 361 आणि 1318 मिळाले आहेत. तसेच, फोन Android 10 सह येईल.
फ्लिपकार्ट लिस्टिंग
ई-कॉमर्स वेबसाइटवर In 1 फोन भारतातील नवीन ब्लॉकबस्टर असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर लिस्टिंगमध्ये याच्या वैशिष्ट्यांना बॉलीवुड चित्रपटांची नावे देण्यात आली आहेत, जसे की गेमिंगचे गली बॉय, डिस्प्लेचे डॉन, कॅमेऱ्याचे खिलाडी, डेटाला दबंग आणि स्टाइलला सुपरस्टार. फ्लिपकार्ट लिस्टिंग व्यतिरिक्त, XDA डेवलपरने पण या फोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती ऑनलाइन लीक केली होती.
डिजाइन
डिवाइसच्या मागच्या पनल मध्ये X पॅटर्न असेल. तसेच मागे आयताकृती कॅमेरा मॉड्युलसह एक फिंगरप्रिंट सेंसर असेल. तसेच फ्रंटला फोनमध्ये मध्यभागी पंच-होल कॅमेरा असेल, त्यामुळे फोनच्या तिन्ही कडा बेजललेस असतिल. तसेच फोनच्या खाली रुंद चिन पार्ट दिसत आहे. त्याचबरोबर स्पष्ट झाले आहे की फोन ब्लू आणि सिल्वर कलर ऑप्शनमध्ये लॉन्च होईल.
स्पेसिफिकेशन्स
XDA डेवलपर तुषार मेहताने दिलेल्या माहितीनुसार फोनमध्ये 6.67 इंचाचा IPS LCD पॅनल दिला जाऊ शकतो, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1080×2460 पिक्सल असेल. तसेच, फोन 6जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. प्रोसेसरबद्दल बोलायचे तर हा फोन मीडियाटेक हीलियो G80 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो.
फोटोग्राफीसाठी फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल आणि दोन 2 मेगापिक्सलचे कॅमेरा सेंसर मिळतील. फोनमध्ये सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. तसेच फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंगसह येऊ शकते.