Jio ने सादर केली Wi-Fi कॉलिंग सर्विस, नेटवर्कविना करता येईल वॉयस तसेच वीडियो कॉल

टेलीकॉम सेक्टर मध्ये Jio आणि Airtel मधील युद्धाची सर्वाना माहिती आहे. हे युद्ध पुढे वाढवत Reliance Jio ने Airtel नंतर आपली VoWi-Fi म्हणजे वॉइस ओवर वाई-फाई सर्विस अधिकृतपणे सादर केली आहे. याआधी एयरटेलने हि सर्विस सादर केली आहे. 5जी नेटवर्कच्या सुरवातीच्या आधी कॉलिंगसाठी एका नवीन टेक्नोलॉजीच्या माध्यमातून वॉयस कॉलिंगच्या नवीन युगाची सुरवात होत आहे असे बोलले जात आहे.

याला वॉइस ओवर वाई-फाई (VoWiFi) असे म्हणतात. जिथे नेटवर्क पोचत नाही तिथे या फीचरचा वापर केला जाऊ शकतो. नेटवर्क नसणाऱ्या ठिकाणी यूजर्स वाई-फाई कनेक्शनच्या माध्यमातून कोणालाही कॉल करू शकतात. जियो वाई-फाई कॉलिंग फीचरच्या मदतीने जियो सब्सक्राइबर्स वाई-फाई नेटवर्क वर वॉयस आणि वीडियो कॉल करू शकतील.

अनेक दिवस हि सर्विस टेस्ट केली जात होती, आता हि अधिकृतपणे सादर करण्यात आली आहे. Jio ने देशभर हि सर्विस सादर करण्याची घोषणा केली आहे. या सर्विस मध्ये यूजर्स वॉयस कॉल तसेच वीडियो कॉल पण करू शकतील. हि सेवा फेजच्या आधारावर 16 जानेवारी पर्यंत सर्व ठिकाणी लॉन्च केली जाईल. टेलीकॉम कंपनी Jio चा दावा आहे कि Jio Wi-Fi कॉलिंग सर्विस 150 हँडसेट मॉडेलला सपोर्ट करते. तर Airtel च्या सर्विसचा फायदा Apple, OnePlus, Samsung आणि Xiaomi सारख्या ब्रँडसच्या काही स्मार्टफोन यूजर्ससाठी आहे.हि

असा करा VoWi-Fi च्या मदतीने कॉल

VoWi-Fi फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी आपल्या हँडसेटच्या कॉल सेटिंग्स मेन्यू मध्ये जाऊन हे फीचर ऑन करावे लागेल. जे तुम्हाला Wi-Fi Calling सेटिंग्स मध्ये दिसेल. जर डिवाइस मध्ये नेटवर्क नसेल तरी हि सर्विस एक्टिवेट करता येईल. एयरटेलच्या या सेवेसाठी एका ऍक्टिव्ह वाई-फाई नेटवर्कची गरज आहे. हि फेसटाइम, व्हाट्सऍप व मेसेंजर कॉलिंग प्रमाणे काम करते.

जाणून घ्या VoWi-Fi म्हणजे काय

VoWi-Fi म्हणजे वॉयस ओवर वाई-फाई. सध्या भारतात VoLTE म्हणजे वॉयस ओवर एलटीई सर्विस उपलब्ध आहे. VoLTE सर्विस मध्ये वॉयस कॉल सिम नेटवर्क मधील इंटरनेट द्वारे केला जातो. तसेच येणाऱ्या कॉल मुळे पण फोन मधील इंटरनेट स्पीड कमी होत नाही. पण VoWi-Fi मध्ये वॉयस कॉल करण्यासाठी सिम नेटवर्क आणि त्यातील इंटरनेटची पण जरूरत गरज पडत नाही. म्हणजे फोन मध्ये सिग्नल नसल्यास पण एखाद्या वाई-फाई नेटवर्कच्या माध्यमातून कॉल करता येईल. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वॉयस सर्विस आईपी द्वारे वाई-फाई नेटवर्क वर डिलीवर केली जाते.

या अनोख्या टेक्नॉलॉजी मुळे ग्राहक कोणत्याही मोबाईल नेटवर्कविना कॉल करू शकतात. VoWi-Fi चा सर्वात मोठा फायदा दुर्गम आणि ग्रामीण विभागांना मिळेल जिथे टेलीकॉम कंपन्यांचे टॉवर नसतात आणि नेटवर्क कमी मिळतो. या टेक्नॉलॉजीमुळे कमकुवत सिग्नल असल्यास पण चांगल्या कॉलिंगची मजा घेता येईल आणि इंडोर किंवा अंडरग्राउंड व बेसमेंट मध्ये पण चांगली कनेक्टिविटी मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here