टेक्नो येत्या काही आठवड्यांमध्ये आपल्या फँटम सीरीजचा विस्तार करू शकते. यानुसार TECNO Phantom V Fold 2 आणि TECNO Phantom V Flip 2 स्मार्टफोन बाजारात येण्याची शक्यता आहे. दोन्ही मोबाईल याआधी काही सर्टिफिकेशन वेबसाईटवर पाहिले गेले आहेत. तसेच, ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड वेबसाईट (BIS) वर हे आल्याने भारतातील लाँचची शक्यता वाढली आहे. चला, पुढे लिस्टिंगची माहिती आणि इतर माहिती सविस्तर जाणून घेऊया.
TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 बीआयएस लिस्टिंग
- भारतीय BIS सर्टिफिकेशनवर TECNO ब्रँडिंग अंतर्गत दोन मॉडेल नंबर लिस्ट केले आहेत.
- एक फोन AE10 आणि आणि दुसरा AE11 मॉडेल नंबरसह लिस्टेड आहे. परंतु यात फोनचे नाव नाही, मात्र पहिले लिस्टिंगनुसार हा आगामी फोल्ड आणि फिल्प डिव्हाईससाठी आहे.
- BIS वर समोर आलेल्या माहितीनुसार AE10 मॉडेल नंबर TECNO Phantom V Fold 2 साठी आहे. तर AE11 Tecno Phantom V Flip 2 चा आहे.
- तसेच ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड वेबसाईटवर मॉडेल नंबर व्यतिरिक्त आणि काही समोर आले नाही.
TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 ची माहिती (इतर लिस्टिंग)
- गुगल प्ले कंसोलवर आलेल्या माहितीनुसार Tecno Phantom V Fold 2 मध्ये MediaTek MT6983Z/TCZA कोडनेम असलेला चिपसेट मिळू शकतो. हा MediaTek Dimensity 9000+ असण्याची शक्यता आहे.
- Dimensity 9000+ चिपची माहिती गीकबेंच साईटवर पण आली आहे.
- TECNO Phantom V Fold 2 मोबाईलमध्ये जवळपास 12GB RAM दिली जाऊ शकते.
- गीकबेंचवर हा पण खुलासा झाला आहे की नवीन डिव्हाईस Android 14 OS सह येऊ शकतो.
- TUV लिस्टिंगमध्ये फोल्ड मॉडेलमध्ये 5610mAh (2973 mAh + 2637 mAh) ची ड्युअल बॅटरी दिली जाणार असल्याची गोष्ट समोर आली होती.
- Tecno Phantom V Flip 2 पाहता हा FCC सर्टिफिकेशनमध्ये दिसला होता.
- लिस्टिंगमध्ये डिव्हाईस जवळपास 8GB रॅम + 256GB इंटरनल स्टोरेज असलेला सांगण्यात आले आहे.
- FCC सर्टिफिकेशनवरून माहिती मिळाली आहे की डिव्हाईसमध्ये ड्युअल बॅटरी मिळू शकते. ज्याची साईज
- 3410mAh + 1180mAh म्हणजे एकूण 4590mAh ठेवली जाईल.
- Tecno Phantom V Flip 2 5G मध्ये चार्जिंगसाठी 70W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.