वियतनामच्या कंपनी ने भारतात लॉन्च केले एक साथ 5 नवीन फोन, शानदार स्पेसिफिकेशन्स सह येत आहेत बजेट मध्ये

वियतनामच्या टेक कंपनी मोबिस्टार ने मे महिन्यात भारतात पाऊल टाकले होते. तेव्हा कंपनी ने एक्सक्यू डुअल आणि सीक्यू नावाचे दोन फोन लॉन्च केले होते. आज पुन्हा एकदा देशात आपल्या स्मार्टफोंस ची संख्या वाढवीत मोबिस्टार ने एक साथ 5 नवीन स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. कंपनी ने सी1, सी1 लाइट, सी2, ई1 सेल्फी आणि एक्स1 डुअल सादर केले आहेत या सर्व स्मार्टफोंस चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत खालील प्रमाणे आहेत :

मोबिस्टार सी1
मोबिस्टार ने हा स्मार्टफोन 480 x 960​ पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.84-इंचाच्या आईपीएस फुलव्यू डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. एफडब्ल्यूवीजीए+ रेज्ल्यूशन ला सपोर्ट करणारा हा डिस्प्ले 2.75डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी रॅम दिला आहे तसेच फोन ची इंटरनल स्टोरेज 16जीबी आहे जी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी साठी मोबिस्टार सी1 मध्ये 5-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. डुअल हाइब्रिड सिम सह हा फोन 4जी नेटवर्क ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,000एमएएच च्या बॅटरी ला सपोर्ट करतो.

मोबिस्टार सी1 लाइट
हा स्मार्टफोन सी1 चा छोटा वर्जन आहे. हा फोन पण 480 x 960​ पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.34-इंचाच्या आईपीएस फुलव्यू डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो एफडब्ल्यूवीजीए+ रेज्ल्यूशन सह 2.75डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. कंपनी ने या फोन मध्ये 1जीबी रॅम देण्यात आला आहे तसेच फोन ची इंटरनल स्टोरेज 8जीबी जी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी साठी सी1 लाइट च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल वर 5-मेगापिक्सल चा रियर आणि सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोन मध्ये 2 सिम सोबत 1 वेगळा माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 2,700एमएएच च्या बॅटरी ला सपोर्ट करतो.

मोबिस्टार सी2
मोबिस्टार सी2 पण 480 x 960​ पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.34-इंचाच्या आईपीएस फुलव्यू डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. एफडब्ल्यूवीजीए+ रेज्ल्यूशन ला सपोर्ट करणारा हा फोन चा डिस्प्ले पण 2.75डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. मोबिस्टार ने आपला हा फोन 2जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सी2 स्मार्टफोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी पण या स्मार्टफोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन मध्ये डुअल हाइब्रिड सिम स्लॉट आहे. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,000एमएएच च्या बॅटरी ला सपोर्ट करतो.

मोबिस्टार ई1 सेल्फी
मोबिस्टार ने या स्मार्टफोन मध्ये 720 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.45-इंचाच्या आईपीएस एचडी+ फुलव्यू डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. कंपनी ने हा फोन 3जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 32जीबी इंटरनल मेमरी ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते.

नावाप्रमाणे मोबिस्टार ई1 सेल्फी खासकरून सेल्फी शौकिन तरुण तरुणींसाठी बनवण्यात आला आहे. फोन च्या फ्रंट पॅनल वर 13-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात आर्कषक फिल्टर्स आहेत. तसेच फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल हाइब्रिड सिम सोबत हा फोन 4जी नेटवर्क ला सपोर्ट करतो. तसेच फेस अनलॉक व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत यात पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

मोबिस्टार एक्स1 डुअल
मोबिस्टार ने आज लॉन्च केलेल्या सर्व स्मार्टफोंस मधील सर्वात दमदार स्मार्टफोन आहे. फोन मध्ये 720 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.45-इंचाचा आईपीएस एचडी+ फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. कंपनी ने हा फोन 3जीबी रॅम सह सादर केला आहे. हा स्मार्टफोन 32जीबी इंटरनल मेमरी ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते.

मोबिस्टार एक्स1 डुअल कंपनी चा पहिला डुअल फ्रंट कॅमेरा वाला फोन आहे. याच्या फ्रंट पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि 8-मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे जो 120 ​डिग्री च्या वाइड एंगल ला सपोर्ट करतो. तसेच फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश सह 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल हाइब्रिड सिम सह हा फोन 4जी नेटवर्क ला सपोर्ट करतो. तसेच फेस अनलॉक व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता मोबिस्टार ने सी1 लाइट सर्वात कमी म्हणजे 4,320 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच सी1 5,400 रुपये, सी2 6,300 रुपये, ई1 सेल्फी 8,400 रुपये आणि एक्स1 डुअल 10,500 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here