Exclusive : Motorola One Action का फोटो आणि स्पेसिफिकेशन्स बघा सर्वात आधी इथे

91मोबाईल्स ने अलीकडेच माहिती दिली होती कि टेक कंपनी Motorola आपल्या वन स्मार्टफोन सीरीजच्या नवीन डिवाईस वर काम करत आहे जो Motorola One Action नावाने लॉन्च केला जाईल. आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये आम्ही या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आमच्या वाचकांशी शेअर केले होते. आज पुन्हा एकदा आम्ही या स्मार्टफोन संबंधित अशीच बातमी घेऊन आलो आहे जी फक्त 91मोबाईल्स कडे आहे. आज आमच्या अजून एका एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये आम्ही तुम्हाला लॉन्चच्या आधीच Motorola One Action चा फोटो दाखवणार आहोत, ज्यावरून तुम्हाला या फोनच्या लुक आणि डिजाईनची माहिती पण मिळेल.

डिजाईन

Motorola One Action कंपनी द्वारा पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे Motorola One Action कंपनीचा दुसरा पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन असेल. Motorola One Vision च्या रूपाने कंपनीने आपला पहिला पंच-होल डिस्प्ले असलेला फोन सादर केला होता जो येत्या 20 जूनला इंडियन बाजारात लॉन्च होईल . Motorola One Action पाहता फ्रंट पॅनल वर फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट दिला जाईल.

Motorola च्या या फोन मध्ये डिस्प्ले वर डावीकडे बारीक छिद्र असेल आणि या मध्ये फोनचा सेल्फी कॅमेरा असेल . One Action च्या बॅक पॅनल वर कंपनी ट्रिपल रियर कॅमेरा देईल जो उजवीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप सोबतच कंपनीने 117डिग्री वाइड एंगल लेन्सची क्षमता पण लिहली आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर Moto चा लोगो आहे जो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड आहे.

Motorola One Action च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच फोनच्या डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. त्याचप्रमाणे फोनच्या खालच्या पॅनल वर स्पीकर आणि यूएसबी टाईप पोर्ट आहे. विशेष म्हणजे Motorola One Action च्या बॅक पॅनल वर Android One लिहिण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे Motorola One Action एंडरॉयड वन वर्जन वरच लॉन्च केला जाईल.

स्पेसिफिकेशन्स

91मोबाईल्सच्या एक्सक्लूसिव बातमी नुसार मोटोरोला वन सीरीजच्या या नवीन फोन वर पण काम करत आहे जो लवकरच टेक मंचावर सादर केला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार हा फोन पण पंच-होल डिजाईन सह येईल आणि 1,080 x 2,520 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करेल. प्रोसेसिंग साठी Motorola One Action मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9609 चिपसेट असेल जो माली जी72 जीपीयू सह येईल.

Motorola One Action फोटोग्राफी साठी डुअल रियर कॅमेऱ्याला सेटअप सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर दोन कॅमेरा सेंसर असतील ज्यातील एका सेंसरची क्षमता 12.6-मेगापिक्सल असेल. त्याचप्रमाणे सेल्फी साठी या फोन मध्ये 12.6-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Motorola One Action 3जीबी रॅम आणि 4जीबी रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल आणि यात 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी स्टोरेज मिळेल. तसेच रियर फिंगरप्रिंट सेंसर सह फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी असेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here