Motorola बद्दल गेल्या आठवड्यात बातमी समोर आली होती ज्यात कंपनीचा आगामी स्मार्टफोन Moto G20 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर दिसला होता. या लिस्टिंगमध्ये फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता. तसेच आता हा स्मार्टफोन इतर सर्टिफिकेशन साइट एफसीसीवर पण लिस्ट झाला आहे जिथे मोटो जी20 ची बॅटरी डिटेल पण समोर आले आहेत. मोटोरोलाने अजूनतरी फोनच्या लॉन्च कोणतीही माहिती दिली नाही पण आशा व्यक्त केली जात आहे की Moto G20 आता लवकरच बाजारात येऊ शकतो.
Moto G20 चा लेटेस्ट अपडेट हाच आहे कि हा फोन अमेरिकन सर्टिफिकेशन्स साइट एफसीसीवर लिस्ट केला गेला आहे. या सर्टिफिकेशन मध्ये समजले आहे कि मोटो जी20 स्मार्टफोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करेल जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. त्याचबरोबर फोनमध्ये डुअल बँड वाईफाई, ब्लूटूथ आणि एफएम रेडियो सारखे फीचर्स पण दिले जातील. काही दिवसांपूर्वी गीकबेंचवर फोनचे नाव समोर आले होते तसेच एफसीसीवर हा फोन XT2128-1 आणि XT2128-2 मॉडेल नंबरसह सर्टिफाइड केला गेला आहे.
गीकबेंच लिस्टिंग
काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या Moto G20 बेंचमार्किंग लिस्टिंगबद्दल बोलायचे तर ही चीनी सर्टिफिकेशन साइट गीकबेंचवर थेट फोनचे नाव लिहिण्यात आले आहे की मोटोरोलाचा हा फोन जी सीरीजमध्ये लॉन्च होईल. ही लिस्टिंग 17 मार्चची आहे. बेंचमार्किंग स्कोर पाहता मोटो जी20 ला सिंगल-कोरमध्ये 378 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये गीकबेंचने या फोनला 1322 स्कोर दिला आहे.
स्पेसिफिकेशन्स पाहता Moto G20 गीकबेंचवर एंडरॉयड 11 ओएससह दाखवण्यात आला आहे, त्याचबरोबर फोनमध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर तसेच यूनिएसओसी चिपसेट असल्याचे सांगण्यात आले आहे. हा चिपसेट टी700 असू शकतो जो 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे. हा चिपसेट 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याचबरोबर मोटो जी20 गीकबेंचवर 4 जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे.
Moto G30 आणि Moto G10 Power
अलीकडेच भारतात लॉन्च झालेल्या लेटेस्ट स्मार्टफोन्सची किंमत पाहता Moto G30 10,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला तसेच Moto G10 Power 9,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जी माइक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येईल.