भारतात मोबाईल युजर्सची संख्या 116 कोटीच्या वर, बघा कोणाचा झाला फायदा आणि कोणचे नुकसान

भारत जगात सर्वात वेगवान विकसित होणारा मोबाईल बाजार आहे. सध्या देशात 1,021.75 मिलियन म्हणजे जवळपास 102 कोटी मोबाईल युजर्स आहेत. गेल्या काही वर्षांत भारताच्या मोबाईल बाजारात रेकॉर्ड वाढ झाली आहे. या वाढीचे श्रेय थेट Reliance Jio ला दिले जात आहे. जियोच्या एंट्री नंतरच इंटरनेट डेटा आणि वॉयस कॉलिंग पॅकच्या किंमती कमी झाल्या आहेत. आता ट्राईच्या ताजा रिपोर्टने पण स्पष्ट केले आहे कि गेल्या महिन्यात इंडियन टेलीकॉम कंपन्यांचा यूजरबेस कमी झाला आहे पण Jio ने आपला यूजर बेस अजून मजबूत केला आहे.

जियोला फायदा तर वोडाफोन आइडिया आणि एयरटेलचे नुकसान
टेलीकॉम कंपन्यांबद्दल बोलायचे झाले तर मार्च मध्ये Reliance Jio ने 9.4 कोटी नवीन युजर्सना आपल्या नेटवर्कशी जोडले आहे. जियोच्या यूजरबेस मध्ये वाढ झाली आहे तर Vodafone Idea आणि Airtel टेलीकॉम कंपन्यांचे युजर्स आधीपेक्षा कमी झाले आहेत. ट्राईच्या रिपोर्ट नुसार फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत Vodafone Idea चे 14.5 मिलियन उपभोक्ता कमी झाले आहेत तर Airtel ने 15.1 मिलियन युजर्स गमावले आहेत.

एका महिन्यात झालेल्या या मोठ्या बदलानंतर 31 मार्च 2019 पर्यंत Reliance Jio चा उपभोक्ता आधार 307.7 मिलियन झाला आहे. म्हणजे जियो नेटवर्क वर एकूण 30.7 कोटी युजर्स जोडले गेले आहेत. तर याच तारखेपर्यंत Vodafone Idea नेटवर्क वर एकूण 394.8 मिलियन म्हणजे 39.48 कोटी युजर्स मोजले गेले आहेत तसेच Bharti Airtel ची एकूण युजर्स संख्या 325.2 मिलियन म्हणजे 32.52 कोटी आहे.

हे देखील वाचा: पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह भारतात येत आहे Realme X, किंमत असेल जवळपास 18 हजार रुपये

मार्च मध्ये कमी झाले युजर्स
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राई) ने मार्च महिन्याचा रिपोर्ट सादर केला आहे ज्यात इंडियन मोबाईल बाजार सोबत टेलीकॉम कंपन्यांची पण आकडेवारी आहे. ट्राईने सांगितले आहे कि मार्च मध्ये भारताची एकूण मोबाईल ग्राहक संख्या 116.18 कोटी आहे. हैराणीची बाब म्हणजे फेब्रुवारी 2019 मध्ये हा आकडा 118.36 कोटी होता. म्हणजे एका महिन्यात 2.18 कोटी मोबाईल यूजर कमी झाले आहेत.

ट्राई नुसार जियो नेटवर्क वर वाढ झाली तर वोडाफोन आइडिया आणि एयरटेलला नुकसान झाले नंतर देशातील एकूण मोबाईल युजर्सची संख्या कमी झाली आहे. सोबतच भारताची टेलीडेन्सिटी पण आधीपेक्षा 1.82 टक्के घटली आहे. फेब्रुवारी मध्ये देशाची टेलीडेन्सिटी 91.86 टक्के होती पण मार्च 2019 मध्ये भारताची टेलीडेन्सिटी कमी होऊन 90.11 टक्क्यांपर्यंत पोचली आहे.

हे देखील वाचा: 48MP कॅमेऱ्यासह 28 मे ला समोर येईल Redmi K20 स्मार्टफोन, करेल सर्वांची सुट्टी

गावात कमी झाले जास्त यूजर
या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि फेब्रुवारी 2019 मध्ये भारताच्या शहरांत 65.65 कोटी मोबाईल युजर्स होते जे मार्च 2019 मध्ये कमी होऊन 65.04 कोटी झाले आहेत. तर ग्रा​मीण भागांत मार्च 2019 मध्ये मोबाईल ग्राहकांची संख्या 51.13 कोटी होती जी फेब्रुवारी 2019 मध्ये 52.71 कोटी होती. म्हणजे शहरी क्षेत्रात मोबाईल युजर्सची संख्या 0.90 टक्के कमी झाली तर ग्रामीण विभागात 2.98 टक्के युजर्स कमी झाले आहेत.

ऍक्टिव्ह युजर्स बद्दल बोलायचे तर सध्या सर्वात जास्त ऍक्टिव्ह युजर्स Airtel नेटवर्कशी जोडलेले आहेत. Airtel चे 100 टक्के ऍक्टिव्ह युजर्स आहेत. तर Vodafone Idea चे ऍक्टिव्ह यूजर 93.27 टक्के आहेत तसेच Reliance Jio चे सर्वात कमी 84 टक्के ऍक्टिव्ह युजर्स आहेत. विशेष म्हणजे मार्च 2019 मध्ये 5.30 मिलियन युजर्सनी आपले नेटवर्क बदलण्यासाठी एमएनपी म्हणजे Mobile Number Portability (MNP) ची रिक्वेस्ट टाकली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here