या दिवशी येत आहे बजेट किंमतीमध्ये Moto G45, जाणून घ्या कोठे होईल सेल आणि काय असू शकतात फिचर्स

Motorola चा नवीन बजेट स्मार्टफोन Moto G45 भारतात Flipkart च्या माध्यमातून लाँच होईल. ई-कॉमर्स वेबसाईटने न फक्त लाँचची तारखेचा खुलासा केला आहे, मात्र फोनची डिझाईन, कलर आणि मुख्य स्पेसिफिकेशन बाबत पण सांगितले आहे. यातच, लीक झालेल्या Moto G45 रेंडर्स मध्ये फोनचा कलर आणि डिझाईनला वेगवेगळ्या अँगलने दाखविण्यात आले आहे.

Moto G45 लाँचची तारीख आणि सेलची माहिती

Moto G45 भारतात 21 ऑगस्टला दुपारी 12 वाजता Flipkart, Motorola.in आणि दुसऱ्या रिटेल आऊटलेटच्या माध्यमातून लाँच केला जाईल. तसेच, Flipkart नं Moto फोनसाठी एक समर्पित मायक्रोसाईट बनविली आहे.

Moto G45 डिझाईन आणि कलर

Flipkart पेजवर फोनला तीन कलर ऑप्शनमध्ये दाखविण्यात आले आहे. डिव्हाईस ब्रिलियंट ग्रीन, वीवा मैजेंटा आणि ब्रिलियंट ब्लू मध्ये स्पॉट करण्यात आले आहे. हे कलर Smartprix द्वारे अलीकडेच लीक झालेल्या Moto G45 रेंडर्सचा पण हिस्सा होते.

तसेच फोनमध्ये वीगन लेदर फिनिश असेल. फोनच्या दोन रिअर कॅमेरा रिअर पॅनल पेक्षा थोडे वरती आहेत. तसेच, साईड फ्लॅट आहेत आणि कडा पातळ आहेत. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन डावीकडे आहेत. डावीकडे सिर्फ सिम कार्ड ट्रे आहे. खालच्या बाजूला यात USB-C पोर्ट, स्पिकर स्लिट, 3.5mm हेडफोन जॅक आणि माईक होल आहेत.

​​Moto G45 चे स्पेसिफिकेशन

  • प्रोसेसर: मोटोरोलाचा दावा आहे की Moto G45 स्नॅपड्रॅगन 6s Gen 3 SoC द्वारे संचालित आपल्या पोर्टफोलियोला सर्वात फास्ट 5G फोन असेल. फोन 13 5G बँड कोला सपोर्ट करेल.
  • मेमरी: फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येईल.
  • डिस्प्ले: तुम्हाला गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन आणि पंच-होल कटआऊटसह 6.5-इंचाचा 120Hz डिस्प्ले मिळेल.
  • कॅमेरा: रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP क्वॉडपिक्सल मेन कॅमेरा असू शकतो. सेकंडरी कॅमेरा 2MP डेप्थ सेन्सर असण्याची गोष्ट सांगितली जात आहे.
  • बॅटरी: लीकर मिस्ट्री ल्यूपिन ऑन द्वारे एक्स वर पोस्टनुसार फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी असेल.
  • इतर: आम्हाला ही पण माहिती मिळाली आहे की फोनमध्ये डॉल्बी एटमॉस, हाय-फाय ऑडियो आणि स्मार्ट कनेक्ट आहे. मिस्ट्री ल्यूपिनने काही फोटोज पण शेअर केले आहेत, ज्यावरून असे वाटत आहे की फोनमध्ये साईड-माऊंटेड फिंगरप्रिंट रिडर, फेस अनलॉक, वॉटर रेजिस्टेंस, बॉक्समध्ये टेम्पर्ड ग्लास आणि बिल्ट-इन सिक्योरिटी स्कॅन फिचर असेल.

भारतात Moto G45 ची किंमत (अफवा)

टेक साईट स्मार्टप्रिक्सच्यानुसार, Moto G45 ची भारतात किंमत जवळपास 15,000 रुपये असू शकते. परंतु आम्हाला माहिती मिळाली आहे की Moto G43 या G44 भारतात नाही आला. मात्र 2022 मध्ये Moto G42 ला सादर केले होते, ज्याची किंमत (4+64GB मॉडेल) ची 13,999 रुपये होती. हा फोन स्नॅपड्रॅगन 680 SoC सह आला होता.

तसेच, ​​Moto G45 चा Snapdragon 6s Gen 3, Moto G34 मध्ये आणला गेलेला Snapdragon 695 चा उन्नत व्हर्जन आहे. G34 ला यावर्षी च्या सुरुवातीला भारतात 4+128GB (10,999 रुपये) आणि 8+128GB (11,999 रुपये) मॉडेल सह लाँच केले आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here