भारतात लॉन्च झाले मोटो जी6 आणि मोटो जी6 प्ले, फेस अनलॉक आणि फूल व्यू​ डिसप्ले सह

मागच्या महिन्यात मोटोरोला ने मोटो जी6 सीरीज फोन ब्राझील मध्ये सादर केला होता. त्यानंतर ही चर्चा सुरू झाली होती की लवकरच हा फोन भारतात पण लॉन्च होईल आणि आज यांना कंपनी ने सादर केले आहे. पण ब्राझील मध्ये कंपनी ने जी6 मध्ये तीन मॉडेल सादर केले होते तर भारतात सध्यातरी दोनच मॉडेल लॉन्च करण्यात आले आहेत. कंपनी ने मोटो जी6 आणि मोटो जी6 प्ले ला लॉन्च केले आहे. मोटो जी6 ची सुरवाती किंमत 13,999 रुपये आहे आणि हा आॅनलाइन स्टोर अमेजॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध आहे. तर मोटो जी6 प्ले फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल याची किंमत 11,999 रुपये आहे.

विशेष म्हणजे आधी मोटो जी सीरीज चे फोन साधारण डिस्प्ले सह येत होते पण यावेळी कंपनी ने बेजल लेस ची सुरवात केली आहे. दोन्ही फोन फूल व्यू डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहेत. खाली आम्ही दोन्ही फोंस ची सविस्तर माहिती दिली आहे.

मोटो जी6 मध्ये तुम्हाल 18:9 आसपेक्ट रेशियो सह 5.7—इंचाची फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. विशेष म्हणजे बेजल लेस डिस्प्ले असूनही यात होम पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. आधीच्या फोन मध्ये कंपनी ने हा मागच्या पॅनल वर दिला होता. मोटो जी6 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो आणि यात 14एनएम वाला 1.8गीगाहट्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी सह उपलब्ध आहे. तर फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट पण आहे.

मोटो च्या या फोन मध्ये डुअल कॅमेरा आहे. फोन मध्ये 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा सह तुम्हाला वाइड बॅकग्राउंड आणि बोके मोड सारखे इफेक्ट मिळतील. या सोबत 8 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे.

ड्यूअल सिम आधा​​रित या मोटो जी6 मध्ये 4जी वोएलटीई सर्पोट आहे. तर वाईफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. कंपनी ने यात फेस अनलॉक फीचर पण दिला आहे. तुमचा चेहरा बघून हा फोन चालू होईल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

मोटो जी6 प्ले या सीरीज चा सर्वात स्वस्त फोन आहे. हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे. मोटो जी6 प्ले मध्ये 5.7—इंचाचा एचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट वर उपलब्ध आहे आणि यात 1.4गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या सोबत 3जीबी रॅम आणि 32जीबी ची मेमरी देण्यात आली आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही माइक्रोएसडी कार्ड वापरू शकता.

मोटो जी6 प्ले मध्ये फोटोग्राफी साठी 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आहे तर सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे. दोन्ही कॅमेरा सोबत तुम्हाला फ्लॅश मिळेल. मोटो जी6 प्ले मध्ये मागच्या पॅनल वर तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 4,000 एमएएच ची बॅटरी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here