32MP सेल्फी कॅमेरा आणि मोठ्या डिस्प्ले सह भारतात आला Honor 20i, बघा किंमत

Huawei च्या सब ब्रँड Honor ने भारतीय बाजारात आपली Honor 20 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने Honor 20 आणि Honor 20 Pro सोबत Honor 20i पण सादर केला आहे. या स्मार्टफोन मध्ये पण दुसऱ्या दोन्ही फोन प्रमाणेच सेल्फी साठी 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन फँटम ब्लू आणि रेड सह मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

किंमत आणि उपलब्धता
Honor 20i ची किंमत पाहता याचा 4जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 14,999 रुपये आहे. डिवाइस 18 जून पासून फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोर विकला जाईल.

Honor 20i चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
स्पेसिफिकेशन पाहता यात 6.21-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) आईपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर किरिन 710 प्रोसेसर दिला जाईल. याचे तीन वेरिएंट सादर केले गेले आहेत. सोबतच यात 4 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये मागे ट्रिपल रियर कॅमेरा असेल, ज्यात 24-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा वाइड-एंगल सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,400 एमएएच ची बॅटरी आहे जी 10 वाट चार्जिंग सपोर्ट सह येते. कनेक्टिविटी साठी स्मार्टफोन मध्ये 4जी वीओएलटीई, वाई-फाई 802.11 एसी, ब्लूटूथ वर्जन 4.2, जीपीएस, माइक्रो-यूएसबी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here