मोटो जी7 आणि मोटोरोला वन भारतात झाले लॉन्च, बघा किंमत आणि किती दमदार आहेत स्पेसिफिकेशन्स

मोटोरोला ने काही दिवसांपूर्वी अंर्तराष्ट्रीय मंचावर मोटो जी7 सीरीजचा विस्तार करत 4 शानदार स्मार्टफोन लॉन्च केले होते ज्यात मोटो जी7, मोटो जी7 प्ले, मोटो जी7 प्लस आणि मोटो जी7 पावर स्मार्टफोन यांचा समावेश आहे. या चार पॅकी मोटो जी7 पावर इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये आधीच सेल साठी उपलब्ध झाला आहे तर आज आपल्या इंडियन फॅन्सना भेट देत मोटोरोला ने या स्मार्टफोन सीरीजचा अजून एक फोन मोटो जी7 पण भारतीय बाजारात आणला आहे. मोटो जी7 सोबत कंपनी ने आपला नवीन एंडरॉयन वन आधारित स्मार्टफोन मोटो वन पण भारतात लॉन्च केला आहे. चला तर एक नजर टाकूया मोटोरोलाच्या या दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर:

मोटो जी7
हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2270 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.24-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनी ने मोटो जी7 मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल मेमरी दिली आहे जी माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येते. एंडरॉयड 9 पाई सह मोटो जी7 1.8गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालतो.

कंपनीने मोटो जी7 मध्ये 4जीबी रॅम दिला आहे. हा स्मार्टफोन 64जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मोटो जी7 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

मोटो जी7 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन आईपी रेटिड ठेवला आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळीपासून वाचतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी मोटो जी7 मध्ये टर्बो चार्जर टेक्नलॉजी असलेली 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

मोटोरोला वन
नावावरूनच समजते कि मोटोरोला वन एंडरॉयड वन आधारित स्मार्टफोन आहे. एंडरॉयड वन असल्यामुळे या फोनला एंडरॉयडच्या प्रत्येक वर्जनचा अपडेट सर्वात आधी मिळेल. म्हणजे एंडरॉयड क्यू रोलआउट होताच त्या ओएस ने अपडेट होणाऱ्या स्मार्टफोन्स मध्ये मोटोरोला वन पण असेल. स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या मॅक्स विजन डिस्प्ले वर सादर करण्यात आला आहे ज्यात वरच्या बाजूला नॉच देण्यात आली आहे. हा फोन 2.5डी गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड 5.9-इंचाच्या एचडी+ स्क्रीनला सपोर्ट करतो.

मोटोरोला इंडियाने मोटोरोला वन 4जीबी रॅम मेमरी वर सादर केला आहे. हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी वाढवता येते. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर झाला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 625 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी मोटोरोला वन मध्ये एड्रेनो 506जीपीयू आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन पण डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बे​डेड मोटोरोला लोगो आहे. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन टर्बोपावर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत व उपलब्धता
मोटो जी7 कंपनी द्वारा भारतात 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट सोबत आफलाईन रिटेल स्टोर्स वर आज पासून सेल साठी उपलब्ध होईल आहे. मोटो जी7 सिरॅमिक ब्लॅक आणि क्लियन वाईट कलर मध्ये घेता येईल.

मोटोरोलाची किंमत कंपनीने 13,999 रुपये ठेवली आहे. हा फोन पण शॉपिंग साइट फ्लिपकार्ट सहित आफलाईन रिटेल स्टोर्स वर विकला जाईल. मोटोरोला वन सिरॅमिक ब्लॅक आणि क्लियन वाईट कलर वेरिएंट मध्ये आज पासून सेल साठी उपलब्ध झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here