MediaTek 8020 प्रोसेसरसह Motorola Edge 40 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

Highlights

  • ह्यात 14 5G Bands चा सपोर्ट मिळतो.
  • Moto Edge 40 आयपी68 सर्टिफाइड आहे.
  • हा 30 मिनिटे पाण्यात राहू शकतो.

मोटोरोलानं आज आपलं शक्तिप्रदर्शन करत भारतात नवीन आणि पावरफुल मोबाइल फोन Motorola Edge 40 लाँच केला आहे. हा भारतीय बाजारात उपलब्ध होणारा पहिला फोन आहे ज्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 8020 चिपसेट मिळतो. अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स असलेल्या मोटोरोला एज 40 ची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Motorola Edge 40 ची किंमत

मोटोरोला एज 40 स्मार्टफोन भारतात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ह्या फोनमध्ये 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Motorola Edge 40 ची किंमत 29,999 रुपये आहे तसेच हा फोन येत्या 30 मे पासून Reseda Green, Jet Black आणि Coronet Blue कलरमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.

Motorola Edge 40 स्पेसिफिकेशन्स

  • 6.55″ pOLED 144Hz Display
  • MediaTek Dimensity 8020
  • 50MP Rear + 32MP Selfie Camera
  • 4,400mAh battery
  • स्क्रीन – मोटोरोला एज 40 मध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.55 इंचाचा फुलएचडी+ 3डी कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येते. ह्या फोनमध्ये 144हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट मिळतो. एज 40 ची स्क्रीन 1200निट्स ब्राइटनेस आणि एचडीआर10+ सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.
  • प्रोसेसर – Motorola Edge 40 भारतात लाँच होणारा पहिला मोबाइल फोन आहे जो मीडियाटेक डायमेन्सिटी 8020 चिपसेटला सपोर्ट करतो. हा 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला ऑक्टाकोर प्रोसेसर आहे जो 2.6गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे. फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे ज्यात 2 वर्ष OS तसेच 3 वर्ष SMR अपडेट मिळेल.
  • कॅमेरा – फोटोग्राफीसाठी मोटो एज 40 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.4 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा 1/1.5-इंच सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या मॅक्रो व्हिजन अल्ट्रावाइड अँगल लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे
  • बॅटरी – Motorola Edge 40 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,400एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ही वेगानं चार्ज करण्यासाठी फोन 68वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. तसेच हा मोटोरोला मोबाइल फोन 15वॉट वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. कंपनीनुसार फक्त 10 मिनिटांच्या चार्जमध्ये हा फोन संपूर्ण दिवसाचा बॅकअप देऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here