Motorola Edge 50 Pro चे भारतीय लाँच झाले कंफर्म, फ्लिपकार्टवर माहिती आली समोर

HIGHLIGHTS

  • Motorola Edge 50 Pro फ्लिपकार्टवर लिस्ट झाला आहे.
  • फोनमध्ये 6.7 इंचाचा POLED 3डी कर्व्ड डिस्प्ले मिळेल.
  • यात जगातील पहिला पॅनटोन आधारित डिस्प्ले आणि कॅमेरा असेल.

मोटोरोलाने आपल्या नवीन एज सीरिज स्मार्टफोनचे लाँच कंफर्म केले आहे. याला Motorola Edge 50 Pro नावाने भारतीय बाजारात सादर केले जाईल. परंतु अजून लाँचची तारीख सांगण्यात आलेली नाही, परंतु ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर फोनला प्रमुख माहितीसह लिस्ट करण्यात आले आहे. तसेच अलीकडेच ब्रँडने एक नवीन टिझर शेअर केला होता ज्यात 3 एप्रिल तारीख सांगण्यात आली आहे, अपेक्षा केली जात आहे की हा नवीन मोबाईल या दिवशी येऊ शकतो. चला, पुढे तुम्हाला फोनची डिझाईन आणि स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.

Motorola Edge 50 Pro डिझाईन

  • फ्लिपकार्टवर समोर आलेल्या माहितीनुसार Motorola Edge 50 Pro तीन कलर ऑप्शनमध्ये दाखविला आहे ज्यात ब्लू, ब्लॅक आणि सिल्व्हर ऑप्शन दिसून येत आहे. परंतु लाँचच्या वेळी या तिन्ही कलरला वेगळ्या नावाने आणले जाऊ शकते.
  • फोनमध्ये बॅक पॅनलवर एक मोठा कॅमेरा माड्यूल दिसतो, ज्यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि एक एलइडी फ्लॅश आहे. तसेच मधोमध मोटरोलाची ब्रँडिंग दिली आहे.
  • फोनची समोरची साईड पाहता डिव्हाईसमध्ये 3D कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर पंच होल डिझाईन दिसते. तर फोनच्या उजव्या बाजूला पावर आणि वॉल्यूम बटन पाहायला मिळते.

Motorola Edge 50 Pro चे स्पेसिफिकेशन

  • फ्लिपकार्टवर मिळालेल्या माहितीनुसार Motorola Edge 50 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा POLED 3डी कर्व्ड डिस्प्ले मिळेल. यावर 1.5k रिजॉल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट, 2000 निट्स पीक ब्राइटनेस, HDR10+ला सपोर्ट आणि 100% DCI-P3 कलर गॅमटला सपोर्ट असणार आहे.
  • मोटोरोला एज 50 प्रो मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 13MP मॅक्रो कॅमेरा आणि अल्ट्रा वाइड कॅमेऱ्यासह AI टेक्नोलॉजी असलेला प्रो-ग्रेड कॅमेरा सेटअप मिळेल.
  • फोनचे कॅमेरा फिचर्स मध्ये पॅनोरमिक अल्ट्रावाइड शॉट्स, क्रिस्टल क्लियर मॅक्रो शॉट, एआय डायनॅमिक फ्यूजन, अडॅप्टिव स्टेबिलाइजेशन, ऑटो फोकस ट्रॅकिंग, एआय फोटो एन्हांसमेंट इंजिन आणि टिल्ट मोड सारखे अनेक ऑप्शन मिळणार आहेत.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here