सर्वांना परवडेल अशा किंमतीत येतोय Moto E22s; तारीख ठरली, जाणून घ्या किंमत

5000mah battery smartphone moto e22s launched budget Motorola mobile phone check price specifications

Motorola नं गेल्याच महिन्यात टेक मंचावर आपल्या ‘ई’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन Moto E22s लाँच केला आहे जो 4GB RAM, MediaTek Helio G57, 16MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह बाजारात दाखल झाला आहे. हा मोबाइल फोन आता लवकरच भारतीय बाजारात देखील लाँच होऊ शकतो. मोटोरोला इंडियानं आपल्या ऑफिशियल वेबसाइटच्या माध्यमातून खुलासा केला आहे की मोटो ई22एस पुढील आठवड्यात 22 ऑक्टोबरपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. Moto E22s Price बजेटमध्ये ठेवली जाऊ शकते, त्यामुळे हा फोन अनेकांच्या खिशाला परवडेल.

Moto E22s India Launch

मोटोरोला इंडियाच्या वेबसाइटवर मोटो ई22एसचं प्रोडक्ट पेज लाइव्ह करण्यात आलं आहे जिथे फोनच्या फोटोज व स्पेसिफिकेशन्स सोबतच सेल डिटेल्सची माहिती देण्यात आली आहे. कंपनीनं सांगितलं आहे की Moto E22s भारतीय बाजारात 22 ऑक्टोबरपासून सेलसाठी उपलब्ध होईल. भारतात मोटो ई22एस 4GB RAM + 64GB Storage सह सेलसाठी उपलब्ध होईल जो Arctic Blue आणि Eco Black कलरमध्ये विकत घेता येईल. कंपनीनं या स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती दिली नाही परंतु आशा आहे की मोटो ई22एस 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच होईल. हे देखील वाचा: जबरदस्त iQOO Neo7 ची लाँच डेट समजली; MediaTek Dimensity 9000+ चिपसेटसह मिळेल 120W चार्जिंग

5000mah battery smartphone moto e22s launched budget Motorola mobile phone check price specifications

Moto E22s चे स्पेसिफिकेशन्स

जागतिक बाजारात लाँच झाल्यामुळे या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती उपलब्ध आहे. मोटोरोला मोटो ई22एस स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या मोटोरोला मोबाइलचे डायमेंशन 163.95 x 74.94 x 8.49एमएम आणि वजन 185ग्राम आहे.

5000mah battery smartphone moto e22s launched budget Motorola mobile phone check price specifications

Moto E22s अँड्रॉइड 12 आउट ऑफ द बॉक्ससह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी57 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. युरोपमध्ये हा स्मार्टफोन 4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

5000mah battery smartphone moto e22s launched budget Motorola mobile phone check price specifications

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. मोटो ई22एस च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोटोरोला मोबाइलमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: 8,200mAh च्या राक्षसी बॅटरीसह Lenovo Tab P11 Pro (2nd gen) भारतात लाँच, फीचर्स आहेत पावरफुल

Motorola Moto E22s एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच हा मोबाइल फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी मोटोरोला ई22एस मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here