Lenovo नं आज भारतीय बाजारात आपला नवीन टॅबलेट डिवायस Lenovo Tab P11 Pro (2nd Gen) लाँच केला आहे. कंपनीनं यात 8,200mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. या टॅबलेट सीरिजमधील कंपनीचा हा तिसरा डिवाइस आहे. कंपनीनं याआधी बाजारात Lenovo Tab P11 आणि Lenovo Tab P11 Plus सादर केले आहेत. नवीन मॉडेल सर्वात पावरफुल टॅबलेट आहे जो गेल्यावर्षी लाँच झालेल्या Lenovo Tab P11 Pro चा अपग्रेडेड व्हर्जन म्हणून सादर करण्यात आला आहे. या नवीन लेनोवो टॅब पी11 प्रो ची किंमत 39,999 रुपये आहे ज्याच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.
Lenovo Tab P11 Pro (2nd gen)
Lenovo Tab P11 Pro (2nd gen) टॅबलेट 2के पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 11.2 इंचाच्या ओएलईडी डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. या टॅबलेटची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते तसेच 600निट्स ब्राइटनेस, एचडीआर10+ आणि डॉल्बी व्हिजन एचडीआर सारख्या फीचर्सना सपोर्ट करते. या टॅबलेट डिवायसचे डायमेंशन 263.66 x 166.67 x 6.8एमएम आणि वजन 480ग्राम आहे. हे देखील वाचा: 14 हजारांत 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही; Infinix चा किफायतशीर Laptop देखील लाँच, पाहा फीचर्स आणि प्राइस
लेनोवो टॅब पी11 प्रो (2 जेनरेशन) अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो MediaTek Kompanio 1300T चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी या टॅबलेट डिवायसमध्ये एआरएम माली-जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे. हा टॅबलेट डिवायस 8 जीबी रॅमसह लाँच झाला आहे ज्यात 256 जीबी इंटरनल स्टोरेजसह 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट मिळतो.
Lenovo Tab P11 Pro (2nd gen) च्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टॅबलेट डिवायस 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पवार बॅकअपसाठी या लेनोवो टॅबमध्ये 8,200एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीच्या दाव्यानुसार 14 तासांचा बॅकअप देऊ शकते. हे देखील वाचा: ओप्पो मोबाइल्सवर बंदीचं सावट; Nokia नं चिनी कंपनीला खेचलं कोर्टात, जाणून घ्या प्रकरण
हा लेनोवो टॅबलेट Pen 3 stylus सह येतो जो टॅबच्या रियर पॅनलवर ठेवून वायरलेस पद्धतीनं चार्ज करता येईल. तसेच Lenovo Tab P11 Pro (2nd gen) मध्ये क्वॉड स्पिकर आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात वायफाय6 आणि ब्लूटूथ 5.1 देण्यात आला आहे. येत्या 17 ऑक्टोबर पासून Lenovo Tab P11 Pro (2nd gen) को 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.