5,000एमएएच बॅटरी आणि स्टाइलस पेन सह लॉन्च झाले Moto G8 Power आणि Moto G Stylus

Motorola बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि कंपनी मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस 2020 च्या मंचावरून Moto G Stylus आणि Moto G8 Power स्मार्टफोन सादर करू शकते. पण आपल्या फॅन्स आणि टेक विश्वाला आश्चर्याचा धक्का देत मोटोरोलाने हे दोन्ही स्मार्टफोन MWC 2020 च्या आधीच ग्लोबल मंचावर सादर केले आहेत. कंपनीने मोटो जी स्टाइलस आणि मोटो जी पावर अमेरिकन बाजारात लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन मीडरेंज सेग्मेंट मध्ये सादर केले गेले आहेत. Moto G8 Power ताकदवान बॅटरी सह आला आहे तर Moto G Stylus कंपनीने स्टाइलस पेन सह लॉन्च केला आहे. चला एक नजर टाकूया या दोन्ही स्मार्टफोन्स वर :

Moto G Stylus

मोटो जी स्टाइलस कंपनीने पंच-होल डिजाईन वर सादर केला आहे जो 1080 x 2300 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. Motorola ने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. Moto G Stylus 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto G Stylus ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 16 मेगापिक्सलचा ऍक्शन कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या पंच-होल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि पावर बॅकअपसाठी 10वॉट रॅपिड चार्ज असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आला आहे. Moto G Stylus मधील स्टाइलस पेन खालच्या बाजूला उजवीकडे देण्यात आला आहे.

Moto G8 Power

मोटो जी8 पावर कंपनीने 1080 x 2300 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 10 आधारित आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. कंपनीने हा फोन 4 जीबी रॅम वर सादर केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.

Moto G8 Power ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर मोटो जी8 पावर मध्ये 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या पंच-होल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह हा फोन पावर बॅकअपसाठी 10वॉट रॅपिड चार्ज असलेल्या 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Moto G Stylus कंपनीने 299.99 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे जे भारतीय करंसीनुसार 21,500 रुपयांच्या आसपास आहेत. तसेच Moto G8 Power 249.99 यूएस डॉलर वर लॉन्च केले गेले आहेत जे इंडियन करंसीनुसार 17,900 रुपयांच्या आसपास आहेत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here