108Km रेंज सह येऊ शकते 2023 Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटर; डॉक्युमेंट्समधून खुलासा

Highlights

  • 2023 बजाज चेतक लवकरच भारतीय बाजारात लाँच होऊ शकते.
  • अपग्रेडेड Chetak इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 108KM ची रेंज मिळू शकते.
  • नवीन स्कूटरचा बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटार आधीसारखीच असेल.

Electric Scooter ची वाढती मागणी पाहून असं वाटतंय की आगामी काळात भारतीय बाजारात बॅटरी असलेल्या स्कूटर्सचा वापर जास्त होईल. यामुळे नवीन व जुन्या ऑटो कंपन्या आपापल्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स सादर करत आहेत. आता समोर आलेल्या माहितीनुसार बजाज आपली विजेवर चालणारी Chetak नवीन अवतारात सादर करण्याची योजना बनवत आहे. 2023 Bajaj Chetak Electric Scooter यावेळी जास्त रेंज आणि पावरसह सादर केली जाऊ शकते. ही माहिती इलेक्ट्रिक स्कूटरच्या अपडेटेड मॉडेलचे अप्रूवल डॉक्यूमेंट लीक झाल्यामुळे समोर आली आहे.

इतकी असेल 2023 Bajaj Chetak ची रेंज

Rushlane नं Bajaj च्या नवीन Chetak इलेक्ट्रिक स्कूटरसाठी टाइप अप्रूवलचा फोटो जारी केला आहे. जारी करण्यात आलेल्या या डॉक्यूमेंटमधून माहिती समोर आली आहे की यंदा येत असलेल्या अपडेटेड मॉडेलमध्ये जुन्या Chetak इलेक्ट्रिकपेक्षा 18KM जास्त रेंज मिळेल. सध्या बाजारात असलेली Bajaj Chetak ई-स्कूटर को सिंगल चार्जवर 90 Km पर्यंत चालवता येऊ शकते. म्हणजे आगामी ई-स्कूटरमध्ये 108KM ची रेंज मिळू शकते. परंतु यातील बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटारची क्षमता आधीसारखीच राहू शकते. हे देखील वाचा: फक्त 8 मिनिटांत बॅटरी फुल! 240W चार्जिंगसह Realme GT3 ‘या’ तारखेला येतोय भारतात

लीक डॉक्यूमेंटमध्ये ई-स्कूटर Bajaj Chetak 2413 Premium कोडनेमसह लिस्ट करण्यात आली आहे. यात देण्यात आलेली माहिती पाहता हा मॉडेल जुन्या प्रमाणे 50.4 V 57.24 Ah क्षमतेच्या बॅटरी पॅकसह येऊ शकते. तसेच या बॅटरीचे वजन 24.5 किलोग्राम असू शकते आणि हिची मॅक्सिमम फुल चार्ज रेंज 108 km असू शकते.

इतकेच नव्हे तर नवीन बजाज चेतकचे डायमेंशन देखील जुन्या मॉडेल प्रमाणे असू शकतात. असे दिसतं आहे की डिजाइनमध्ये देखील जास्त बदल दिसणार नाहीत. नवीन मॉडेलमध्ये जुन्या मॉडेलप्रमाणे मेटॅलिक बॉडी, IP67-रेटेड बॅटरी, ट्यूबलेस टायर्स, 18L बूट स्पेस, 4L ग्लव बॉक्स सारखे फीचर्स मिळू शकतात. आशा आहे की Bajaj आगामी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सॉफ्टवेयरमध्ये काही मोठे बदल दिसू शकतात.

2023 Bajaj Chetak मार्केटमधील Ather 450 सीरीज, Ola S1 सीरीज आणि Hero Vida सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर्सना टक्कर देऊ शकते ज्या मोठी रेंज आणि अनेक शानदार फीचर्ससह आल्या आहेत.हे देखील वाचा: अत्यंत स्वस्तात लाँच होईल Samsung Galaxy A24 फोन; Realme ला टक्कर देण्याची प्लॅनिंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here