मोटोरोलाची भेट: 2,000 रुपयांनी स्वस्त झाला मोटो जी6

लेनोवो अधिकृत मोटोरोला कमी किंमतीत दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यासाठी ओळखली जाते आहे. मोटोरोलाचा मोटो जी6 स्मार्टफोन कंपनीच्या हिट स्मार्टफोन्स पैकी एक आहे. आपल्या फॅन्सना खुश करत मोटोरोल ने मोटो जी6 स्मार्टफोनच्या किंमतीती थेट 2,000 रुपयांची कपात केली आहे. मोटोरोला ने हि कपात आॅफलाईन बाजारात केली आहे. म्हणजे मोटो जी6 2,000 रुपयांनी कमी किंमतीत रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल. तर अमेझॉन इंडिया वर मोटो जी6 सध्या जुन्याच किंमतीत विकला जाईल.

मोटो जी6 भारतात दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला होता. एक वेरिएंट 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोनचा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता तर हा आता 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता पण आता हा 13,999 रुपयांमध्ये मिळेल.

मोटो जी6 मध्ये तुम्हाला 18:9 आसपेक्ट रेशियो सह 5.7—इंचाची फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. मोटो जी6 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो आणि यात 14एनएम वाला 1.8गीगाहट्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. मोटो च्या या फोन मध्ये डुअल कॅमेरा आहे. फोन मध्ये 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

या सोबत 8 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे.ड्यूअल सिम आधा​​रित या मोटो जी6 मध्ये 4जी वोएलटीई सर्पोट आहे. तर वाईफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. कंपनी ने यात फेस अनलॉक फीचर पण दिला आहे. तुमचा चेहरा बघून हा फोन चालू होईल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.मोटो जी6 आज पासूनच रिटेल स्टार्स वर नवीन किंमतीत विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here