TV स्क्रीन वर दिसणाऱ्या या नंबर्स मागे कोणते कारण आहे, जाणून घ्या का हे घालवतात टीव्ही बघण्याची मजा

गुगल वरून घेतलेला प्रतीकात्मक फोटो

नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडीओज सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे वेड भारतात वाढत आहे पण केबल चॅनेल अजूनही टेलीविजन मध्ये महत्वाची भूमिका बाजवतात. रोजच्या मालिका असो किंवा बातम्या, सर्व लोक आपल्या आवडीनुसार टीव्ही बघतात आणि मनोरंजन करतात. टेलीविजन वर एखादी क्रिकेट मॅच किंवा एखादा शो बघताना तुम्ही बघितले असेल कि टीव्ही स्क्रीन वर काही वेगळे नंबर मधे मधे येत असतात. हे नंबर टीव्ही बघण्याची मजा तर घालवतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का कि का येतात हे नंबर आणि मजेशीर कार्यक्रम सुरु असताना स्क्रीन अडवण्यामागे कोणते कारण आहे?

कधी येतात हे नंबर

पुढल्या वेळेस जेव्हा तुम्ही एखादी क्रिकेट मॅच किंवा कपिल शर्मा शो इत्यादी बघत असाल तेव्हा तुमच्या मित्राला त्याच्या घरी तोच चॅनेल बघण्यास सांगा. टीव्ही बघताना तुमच्या स्क्रीन वर जेव्हा नंबर फ्लॅश होईल तेव्हा तुमच्या मित्राच्या घरात पण त्याच्या टीव्ही वर तसाच नंबर दिसेल. पण जेव्हा तुम्ही दोन्ही नंबर्स जुळवून बघाल तेव्हा तुमच्या टीव्ही वर आलेला नंबर वेगळा असेल आणि तुमच्या मित्राच्या टीव्ही वर आलेला नंबर वेगळा असेल.

गुगल वरून घेतलेला प्रतीकात्मक फोटो

म्हणजे वेगवेगळ्या युजर्सच्या टीव्ही वर दिसणारा हा नंबर पण वेगवेगळा असतो आणि याचे कारण आहे तुमच्या घरातील सेट-टॉप बॉक्स. हा सेट-टॉप बॉक्स कोणतेही कंपनीचा असो, सर्वांवर असा यूनिक नंबर दिसतो. सर्व सेट-टॉप बॉक्ससाठी वेगवेगळ्या नंबर सह येतात आणि त्यामुळे सर्वांच्या टीव्ही वर दिसणारा नंबर पण इतरांपेक्षा वेगळा आहे. याला VC number म्हणजे व्यूइंग कार्ड नंबर पण म्हणतात.

का दिसतो हा नंबर

हा प्रश्न आतापर्यंत डोक्यात असेल कारण या नंबरची गरज का आहे आणि का चांगल्या शोची मजा खराब करण्यासाठी हा स्क्रीन वर चिपकवला जातो. लाईव मॅच, इंटरटेनमेंट व रियालिटी शो आणि रोजच्या मालिका सुरु असताना स्क्रीन वर फ्लॅश होणाऱ्या या नंबरचे मुख्य कारण आहे पायरेसी आणि कंटेंटची चोरी रोखणे.

हे देखील वाचा :

असे अनेक लोक आहेत जे टीव्ही वर येणारा कंटेंट आपल्या यूट्यब चॅनेल व अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अपलोड करतात. जसे कि क्रिकेट मॅचची लाईव स्ट्रीमिंग आपल्या सोशल प्लॅटफॉर्म वर शेअर करणे आणि एखाद्या शोची रेकॉर्डिंग करून ती आपल्या प्रोफाइल मध्ये अपलोड करण्यासारख्या काही गोष्टी पायरेसी मध्ये येतात आणि प्रसारण मंत्रालय अशी पायरेसी रोखू इच्छिते.

गुगल वरून घेतलेला प्रतीकात्मक फोटो

टीव्ही स्क्रीन वर येणारा हा नंबर युजरच्या सेट-टॉप बॉक्सचा यूनिक आयडी असतो ज्यात त्याचे नाव व पत्ता अशी माहिती असते. त्यामुळे जर कोणी टीव्ही वरील शो किंवा मॅचची रेकॉर्डिेग केली तर स्क्रीन वर येणारा नंबर पण रेकॉर्ड होईल आणि जेव्हा रेकॉर्डिंग किंवा लाईव प्रक्षेपण जेव्हा शेयर केले जाईल तेव्हा सोबत नंबर पण सोशल मीडिया वर अपलोड होईल. आणि या नंबरमुळे पोलीस थेट त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्या व्यक्तीला पकडू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here