लवकरच येऊ शकतो फोल्डेबल Motorola Razr Plus 2023 स्मार्टफोन; लाँचपूर्वी दिसला सर्टिफिकेशन वेबसाइटवर

Highlights

  • Moto Razr 40 Ultra स्मार्टफोन Razr+ 2023 नावानं अनेक मार्केटमध्ये येऊ शकतो.
  • दोन्ही डिवाइस अनेक सर्टिफिकेशन साइटवर दिसले आहेत.
  • रिपोर्टनुसार मोटोरोला रेजर प्लस 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर होईल.

मोटोरोला कथितरित्या आपला Motorola Razr+ 2023 स्मार्टफोन लाँच करण्याची योजना बनवत आहे. अफवा आहे की डिवाइस लवकरच चीनमध्ये लाँच होईल, कारण डिवाइस अलीकडेच चीनी CQC सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला होता, जिथून बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची माहिती मिळाली होती. आता हा डिवाइस TDRA सर्टिफिकेशन आणि कॅनेडियन REL सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे, जिथून महत्वाची माहिती समोर आली आहे.

Motorola Razr+ 2023: TDRA आणि REL सर्टिफिकेशन्स

वरील TDRA सर्टिफिकेशन आणि REL सर्टिफिकेशनच्या फोटोजमध्ये दिसत आहे की Motorola Razr+ 2023 आणि Motorola Razr 40 Ultra दोन्हींचा मॉडेल नंबर (Motorola XT2321-3 आणि Motorola XT2321-1) एकच आहे. त्यामुळे हा फोन वेगवेगळ्या नावांनी लाँच होईल असं वाटत आहे. वेगवेगळ्या ब्रॅंडिंगसह विविध मार्केट्समध्ये एकच स्मार्टफोन लाँच होण्याची ही काही पहिली वेळ नाही, खासकरून मोटोरोला आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सोबत हे करत असतेच. हे देखील वाचा: 12 एप्रिलला लाँच होईल Realme Narzo N55; अ‍ॅमेझॉनवर होईल विक्री

दुर्दैवाने सर्टिफिकेशन लिस्टिंगमधून आम्हाला डिवाइसची इतर कोणतीही माहिती मिळाली नाही. तसेच Motorola Razr+ 2023 स्मार्टफोन CQC मध्ये (मॉडेल नंबर Motorola XT2321-2 सह) दिसला होता. इथे समजलं आहे की डिवाइसमध्ये 33W फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात येईल. तसेच मोटोरोलाच्या या आगामी फोल्डेबल फ्लिप स्मार्टफोनमध्ये कथितरित्या 3,640mAh ची बॅटरी असेल. हे देखील वाचा: 108MP Camera सह Redmi Note 12S जागतिक बाजारात दाखल; पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कधी येईल Motorola Razr 40 Ultra?

पहिल्यांदाच Motorola Razr 40 Ultra हे नाव समोर आलं आहे आणि याच्या स्पेसिफिकेशन्सची काही माहिती देखील समोर आली आहे. अफवा आहे की मोटोरोला रेजर + 2023 चीनमध्ये 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत, लाँच केला जाऊ शकतो. कंपनीनं आपल्या रेजर फ्लिप फोन्सची सुरुवात 2019 मध्ये केली होती. आतापर्यंत या सीरिजमध्ये दोन मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. आगामी Motorola Razr+ 2023 स्मार्टफोन या सीरिजचा तिसरा मॉडेल असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here