12 एप्रिलला लाँच होईल Realme Narzo N55; अ‍ॅमेझॉनवर होईल विक्री

Highlights

  • Realme Narzo N55 स्मार्टफोन 12 एप्रिलला लाँच होत आहे.
  • कंपनीनं या फोनची ऑफिशियल डिजाइन देखील टीज केली आहे.
  • Realme Narzo N55 स्मार्टफोन ड्युअल टोन रियर पॅनल आणि ड्युअल कॅमेरासह येईल.

रियलमीनं घोषणा केली आहे की येत्या 12 एप्रिलला भारतात Realme Narzo N55 लाँच केला आहे. कंपनीनं आता अधिकृतपणे स्मार्टफोनच्या नावाची घोषणा केली आहे, परंतु त्याआधीच या स्मार्टफोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स आम्ही रिपोर्ट केले आहेत. तसेच कंपनीनं या स्मार्टफोनची डिजाईन देखील टीज केली आहे. चला जाणून घेऊया Realme Narzo N55 स्मार्टफोनची लाँच डेट, डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती

रियलमी नारजो एन55 ची लाँच डेट

Realme Narzo N55 स्मार्टफोन 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल, अशी घोषणा कंपनीनं केली आहे. लाँचनंतर हा फोन ई-कॉमर्स अ‍ॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून विकला जाईल. कंपनीनं या नव्या लाइनअपला ‘नेक्स्ट जेन पावर, नेक्स्ट जेन क्लॅरिटी’ अशी टॅगलाइन देखील दिली आहे. हे देखील वाचा: 60MP Selfie कॅमेऱ्यासह Motorola Edge 40 Pro ग्लोबली लाँच; क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसरची ताकदही यात

रियलमी नारजो एन55 ची डिजाईन

वरील ट्विटमध्ये दिसलं असेल की Realme Narzo N55 स्मार्टफोन मागून कसा दिसेल. हा फोन ड्युअल टोन डिजाईनसह येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यातील कॅमेरा मॉड्यूल फोनच्या मागे वरच्या बाजूला डावीकडे देण्यात येईल, ज्याच्या शेजारी एलईडी फ्लॅश दिसत आहे. उजवीकडे व्हॅल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात येईल. पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर असेल की नाही हे समजलं नाही त्यामुळे फोनमध्ये अ‍ॅमोलेड डिस्प्ले असेल की एलसीडी हे सांगता येत नाही.

फोनचा बॉटम भाग याआधीच लीक झाला आहे, ज्यातून समजलं आहे की Realme Narzo N55 मध्ये 3.5एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट मिळेल. फोनच्या फ्रंट लूकची इतकी माहिती मिळाली नाही. त्यामुळे Realme Narzo N55 मध्ये पंचहोल डिस्प्ले मिळेल की वॉटरड्रॉप नॉच हे मात्र स्पष्ट झालं नाही. हे देखील वाचा: विवो घेऊन येत आहे दोन नवीन 5जी फोन; Vivo T2 आणि T2x 5G होतील 11 एप्रिलला भारतात लाँच

लिक्सनुसार हा फोन प्राइम ब्लॅक आणि प्राइम ब्लू कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच या फोनमध्ये 4GB + 128GB, 6GB + 64GB, 6GB + 128GB आणि 8GB + 128GB असे स्टोरेज ऑप्शन मिळू शकतात. फोनबद्दल इतर कोणीतही माहिती उपलब्ध झाल्यास आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच पोहचवू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here