मोटोरोलाने आपल्या होम मार्केट चीनमध्ये आपले दोन फ्लिप स्मार्टफोन दाखल केले आहेत. हे Motorola Razr 50 आणि Motorola Razr 50 Ultra या नावांनी लाँच करण्यात आले आहेत. वापरकर्त्यांना मोबाईलमध्ये 6.9 इंचाचा मोठा फोल्डेबल एलटीपीओ pOLED डिस्प्ले, 165Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 12GB पर्यंत रॅम सारखी अनेक वैशिष्ट्ये मिळतील. चला पुढे याची किंमत आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन तपशीलवार जाणून घेऊया.

Motorola Razr 50 चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: Motorola Razr 50 मध्ये 6.9 इंचाचा (2640×1080 pixels) फ्लेक्सव्ह्यू FHD+ pOLED इंटरनल डिस्प्ले दिला आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट, 10-बिट HDR 10+, 120% DCI-P3 कलर गॅमट, 2600 nits पर्यंत पीक ब्राईटनेस आणि डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट मिळत आहे. तर फोनच्या बाहेरील बाजूस 3.6 इंचाचा (1066 x 1056 पिक्सेल) क्विकव्ह्यू pOLED डिस्प्ले आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट, 100% DCI-P3 कलर गॅमट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षणासह सुसज्ज आहे.
- चिपसेट: Moto Razr 50 मध्ये ग्राहकांना ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 7300X 4nm चिपसेट मिळतो. यासोबत माली-G615 MC2 GPU बसविण्यात आला आहे.
- स्टोरेज: हा मोबाईल 256GB आणि 512GB UFS इंटरनल स्टोरेजसह 8GB RAM आणि 12GB LPDDR4X RAM 2.2 ला सपोर्ट करतो.
- कॅमेरा: फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याला 13MP अल्ट्रा-वाईड कॅमेरा लेन्सचा सपोर्ट मिळतो. तसेच सेल्फीसाठी f/2.4 अपर्चर असलेला 32MP फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी: Motorola Razr 50 मध्ये 4200mAh बॅटरी मिळते, ती फास्ट चार्ज करण्यासाठी 33W टर्बोपॉवर फास्ट आणि 15W वायरलेस चार्जिंगची सुविधा दिली गेली आहे.
- इतर: Motorola Razr 50 मध्ये स्टिरिओ स्पीकर, IPX8 रेटिंग, डॉल्बी ॲटमॉस, साईड-माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, ड्युअल सिम 5G ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.4 सारखे अनेक फिचर्स आहेत.
Motorola Razr 50 Ultra चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: Motorola Razr 50 Ultra मोबाईल मध्ये 6.9 इंचाचा (2640×1080 पिक्सेल) फ्लेक्सव्ह्यू FHD+ pOLED LTPO डिस्प्ले आहे त्यावर 165Hz रिफ्रेश रेट, 10-बिट HDR 10+, 100% DCI-P3 कलर गॅमट, 3000 nits पर्यंत कमाल ब्राईटनेस, डॉल्बी व्हिजन यांसारखी फिचर्स मिळतील. याला आणखी खास बनवते ते म्हणजे त्याचा आऊटर डिस्प्ले, कारण तो 4 इंच (1272×1080 पिक्सेल) क्विकव्ह्यू pOLED LTPO ने सुसज्ज आहे. जो 165Hz रिफ्रेश रेट, 100% DCI-P3 कलर गॅमट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षणासह येतो.
- चिपसेट: अल्ट्रा मॉडेलला ब्रँडने ऑक्टा-कोर Snapdragon 8S Gen 3 मध्ये 4nm मोबाईल प्लॅटफॉर्मसह एन्ट्री दिली आहे. तर ग्राफिक्ससाठी यात ॲड्रेनो 735 GPU लावला आहे.
- स्टोरेज: या डिव्हाईसमध्ये 256GB आणि 512GB UFS 4.0 इंटरनल स्टोरेजसह 12GB LPDDR5X रॅम आहे.
- कॅमेरा: Moto razr 50 ultra मध्ये 1/1.95″ सह 50MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि f/1.79 अपर्चर, OIS सह 50MP 2x टेलीफोटो कॅमेरा आहे. त्याच वेळी सेल्फीसाठी एक उत्कृष्ट 32MP फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी: Motorola Razr 50 Ultra हा 4000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ती चार्ज करण्यासाठी 44W टर्बोपॉवर फास्ट आणि 15W वायरलेस चार्जिंग मिळत आहे.
- इतर: Motorola Razr 50 Ultra मॉडेलमध्ये स्टिरिओ स्पीकर, साईड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, डॉल्बी ॲटमॉस, IPX8 रेटिंग, ड्युअल सिम 5G, 4G VoLTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.3 सारखी फिचर्स आहेत.
- ओएस: दोन्ही Razr 50 मॉडेल Android 14 आधारित My UI 7.0 सह काम करतात.
Motorola Razr 50 आणि Motorola Razr 50 Ultra ची किंमत
- Motorola Razr 50 च्या 8GB रॅम + 256GB मॉडेलची किंमत 3,699 युआन म्हणजे सुमारे 42,500 रुपये आहे.
- फोनच्या 12GB रॅम + 512GB व्हेरिएंटची किंमत 3,999 युआन म्हणजेच अंदाजे 45,945 रुपये आहे.
- Moto Razor 50 हा मून वेल्वेट ब्लॅक, एलिफंट ग्रे आणि पॅशन ऑरेंज अशा तीन कलरमध्ये उपलब्ध असेल.
- Motorola Razr 50 Ultra विंटेज डेनिम, मॉडर्न ग्रीन आणि सॉफ्ट पीच या मर्यादित स्वरूपात येतो.
- 12GB रॅम + 256GB स्टोरेजमध्ये याची किंमत 5,699 युआन म्हणजे सुमारे 65,470 रुपये आहे. तर 12GB रॅम + 512GB ची किंमत 6,199 युआन म्हणजेच अंदाजे 71,220 रुपये ठेवण्यात आली आहे.
- हे दोन्ही फोल्डेबल फोन चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. त्याच वेळी ते लवकरच भारतासह जागतिक स्तरावर लाँच होऊ शकतात.
















