भंगारापासून बनवली Electric Bike; शानदार फीचर्स परंतु किंमत परवडणारी

Nausha Electric Bike: सध्या इलेक्ट्रिक व्हेईकल (Electric vehicles) मध्ये लोकांची रुची मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. भारतीय ग्राहक आता इलेक्ट्रिक पर्यायांकडे जास्त लक्ष देत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. अलीकडेच नौशा इलेक्ट्रिक स्कूटर (Nausha Electric Scooter) नावाच्या एका कंपनीनं किफायतशीर ईव्ही बनवलं आहे, ज्याची किंमत फक्त 35,000 रुपये आहे. तुम्ही अत्यंत कमी किंमतीत ही शानदार इलेक्ट्रिक बाइक आपल्या घरी घेऊन जाऊ शकता. चला जाणून जाणून या खास इलेक्ट्रिक बाइकची सविस्तर माहिती.

Nausha Electric Scooter

ही अनोखी इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे. या ई-बाइकला (e-bike) बनवणाऱ्या कंपनीचा दावा आहे की यातील कोणताही पार्ट चीनवरून आयात केला गेला नाही, उलट ही पूर्णपणे भांगरपासून बनवण्यात आली आहे. मालकाने बाइकला आपलं पॅशन बनवलं आहे. या बाईकचा पहिला प्रोटोटाइप बनवण्यासाठी 40,000 हजार रुपयांचा बजेट खर्च करण्यात आला होता, परंतु ही फक्त 35,000 रुपयांमध्ये पूर्ण करण्यात आली आहे. ही बाइक बनवणाऱ्या व्यक्तीचा दावा आहे की त्यांना ईव्हीसाठी देशभर्तून आणि परदेशातून देखील ऑर्डर आल्या आहेत. सध्यातरी ही बाइक विक्रीसाठी उपलब्ध नाही, परंतु ही लवकरच बाजारात लाँच करण्याची आशा व्यक्त केली आहे. हे देखील वाचा: वनप्लस-सॅमसंग नव्हे तर आयफोनला टक्कर देण्यासाठी येतेय Xiaomi 13 series; लाँचचा मुहूर्त ठरला

नौशा यांच्या मते सर्व काही भंगार आहे, हब मोटर, बॅटरी आणि कंट्रोलर एका दुसऱ्या ईव्हीमधून घेण्यात आले आहेत. सस्पेंशन पार्ट्स देखील दुसऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्स मधून उचलण्यात आले आहेत. हिच्या चाकांचा आकार 10 इंचाचा आहे. बॅटरी, कंट्रोलर, बीएमएस आणि अन्य पार्ट्स मुख्य पाइप आकाराच्या फ्रेम ठेवण्यात आले आहेत. तर मागच्या बाजूला हब मोटर आहे. हिचे दोन प्रोटोटाइप आहेत, एक पिवळा आणि एक काळा. पिवळ्या बाइकमध्ये फ्रंट ड्रम ब्रेक मिळतात, जे काळया बाइकमध्ये नाहीत. या बाइकच्या पुढे एक आफ्टरमार्केट एलईडी हेडलाइट आणि मागे टेललाइट आहे. हे देखील वाचा: विश्वास ठेवता येणार नाही इतक्या स्वस्तात महागड्या फोनमधला डिस्प्ले; Realme 10 Pro सीरिजची किंमत समजली

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here