नोकियाचे मालकी हक्क असणाऱ्या कंपनी एचएमडी ग्लोबल ने गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये नोकिया 8110 4जी बनाना फोन लॉन्च केला होता. आता कंपनी ने वर्षाच्या सुरवातीला जियोफोनला टक्कर देण्यासाठी नवीन फीचर फोन नोकिया 106 भारतात लॉन्च केला आहे. लॉन्च सोबत नोकिया 106 विक्रीसाठी ऑफलाइन रिटेल स्टोर्स तसेच ऑनलाइन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर उपलब्ध करण्यात आला आहे.
Nokia 106 ची खासियत म्हणजे या फोनच्या बॅटरी बद्दल कंपनीचा दावा आहे कि एका चार्ज मध्ये फोनची बॅटरी 21 दिवसांचा स्टॅन्डबाय आणि 15 तास टॉकटाइम देईल. तसेच फोन मध्ये नॉन-टच टीएफटी डिस्प्ले आणि शानदार कीबोर्ड देण्यात आला.
नोकिया 106 ची किंमत
नोकिया 106 (2018) कंपनी ने 1,299 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो ऑफलाइन व ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोन सध्या ग्रे कलर वेरिएंट मधेच उपलब्ध आहे. तसेच फ्लिपकार्ट वर फोन 1,309 रुपये आणि अमेझॉन वर 1,479 रुपयांमध्ये सेल केला जात आहे. पण, फ्लिपकार्ट वर ऍक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 10 टक्क्यांचा डिस्काउंट मिळत आहे.
नोकिया 106 चे स्पेसिफिकेशन
फोनचे स्पेसिफिकेशन पाहता यात 1.8-इंचाचा क्यूक्यूवीजीए डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 160×120 पिक्सल आहे. तसेच हा फीचर फोन मीडियाटेकच्या एमटी6261डी प्रोसेसर वर आधारित आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 4एमबी रॅम आणि 4एमबीची स्टोरेज देण्यात आली आहे.
कनेक्टिविटी साठी फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे.तसेच फोन मध्ये 3.5एमएम चा हेडफोन जॅक देण्यात येत आहे. तसेच या फीचर फोन मध्ये एफएम रेडियो आणि एलईडी फ्लॅश लाइट पण आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 800एमएएच ची बॅटरी आहे.















