अत्यंत कमी किंमतीत लाँच झाला नोकियाचा 5G Phone; जाणून च्या Nokia G400 चे स्पेसिफिकेशन्स आणि प्राइस

नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलनं आपल्या 5जी सेग्मेंटचा विस्तार करत एक नवीन 5जी नोकिया फोन मार्केटमध्ये सादर केला आहे. HMD Global चा हा नवीन मोबाइल फोन Nokia G400 5G नावानं लाँच झाला आहे, जो सध्या अमेरिकन बाजारात उतरवण्यात आला आहे. नोकिया जी400 5जी फोन 4GB RAM, Qualcomm Snapdragon 480+, 48MP Rear आणि 16MP Selfie Camera सह आला आहे, ज्याची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी आहे.

Nokia G400 5G चे स्पेसिफिकेशन्स

Nokia G400 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता, हा मोबाइल फोन 20:9 अस्पेक्ट रेशियोवर सादर केला करण्यात आला आहे. जो 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कंपनीनं कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चा वापर केला आहे. हे देखील वाचा: iPhone 14 Series च्या लाँचचा मुहूर्त ठरला; एकाच इव्हेंटमधून होणार iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max ची एंट्री

नोकिया जी400 5जी फोन अँड्रॉइड 12 वर लाँच केला गेला आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्लस चिपसेट दिला आहे. हा मोबाइल फोन 4जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवण्यासाठी एक एसडी कार्ड स्लॉट देखील मिळतो.

फोटोग्राफीसाठी Nokia G400 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स आहे. जोडीला 5 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नोकिया स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia G400 5G मध्ये 3.5एमएम जॅक व एनएफसीला सपोर्ट सोबतच बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच पावर बॅकअपसाठी हा मोबाइल 20वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: फोनच्या मागेच फिट होतात TWS Earbuds; हटके Nokia 5710 XpressAudio देतो 31 दिवसांचा बॅकअप

किंमत आणि उपलब्धता

यूएसमध्ये नोकिया जी400 5जी फोन Meteor Grey कलरमध्ये लाँच झाला आहे. कंपनीनं स्मार्टफोनचा एकच रॅम व स्टोरेज व्हेरिएंट सादर केला आहे. तिथे या नव्या मोतिया फोनची किंमत 239 डॉलर्स ठेवण्यात आली आहे. ही किंमत भारतीय चलनात रूपांतरित केल्यास जवळपास 19,000 रुपये होते. भारतात हा फोन कधी लाँच होईल याची अधिकृत माहिती समोर आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here