नॉच डिस्प्ले वाला नोकिया 5.1 प्लस सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, लवकरच होऊ शकतो लॉन्च

नोकिया बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की नोकिया चे मालकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल नोकिया 5.1 च्या अजून एका वर्जन नोकिया 5.1 प्लस वर काम करत आहे जो आगामी दिवसांमध्ये बाजारात येईल. नोकिया 5.1 प्लस बद्दल काही दिवसांपूर्वी फोन चा 360 डिग्री वीडियो समोर आला होता ज्यातून फोन च्या डिजाईन सह याच्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती पण मिळाली होती. तसेच आता नोकिया चा हा शानदार स्मार्टफोन टेना वर पण लिस्ट करण्यात आला आहे.

नोकिया 5.1 प्लस चीनी स​​र्टिफिकेशन साइट टेना वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये फोन च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली आहे. टेना नुसार नोकिया 5.1 प्लस मध्ये 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.86-इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला जाईल. हा फोन पण नोकिया एक्स6 प्रमाणे बेजल लेस डिजाईन वाल्या नॉच डिसप्ले सह सादर केला जाऊ शकतो. हा फोन एंडरॉयड 8.1.0 ओरियो वर लॉन्च केला जाईल.

टेना नुसार नोकिया 5.1 प्लस तिन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यात 3जीबी, 4जीबी आणि 6जीबी चे आॅप्शन असतील. तसेच स्टोरेज साठी या फोन मध्ये 32जीबी आणि 64जीबी आॅप्शन ​दिले जाऊ शकतात ज्यांची मेमरी 128जीबी पर्यंत वाढवता येईल. हा फोन 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी सीरीज किंवा मग क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 600 सीरीज चिपसेट वर लॉन्च केला जाईल. चिपसेट ची संपूर्ण माहिती लिस्टिंग मध्ये नाही.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 5.1 प्लस मध्ये डुअल रियर कॅमेरा असेल. टेना नुसार या फोन मध्ये 13-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर मिळतील. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. पण नोकिया 5.1 प्लस चे हे स्पेसिफिकेशन्स किती खरे आहेत आणि हा फोन कधी बाजारात येईल यासाठी एचएमडी ग्लोबल च्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here