नोकियाचे स्मार्टफोन विकण्याचे हक्क असणाऱ्या कंपनी एचएमडी ग्लोबल ने गेल्यावर्षी ऑगस्ट मध्ये नोकिया ने 5.1 प्लस मॉडेल भारतात सादर केला होता. लॉन्च नंतर हा फोन फक्त फ्लिपकार्ट आणि नोकिया ऑनलाइन स्टोर वर विकला जात होता. पण आता नोकिया ने हा फोन ग्राहकांसाठी ऑफलाइन स्टोर वर उपलब्ध केला आहे. आता हा फोन भारतात ऑफलाइन स्टोर वर विकत घेता येईल. ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन स्टोर वर याची किंमत जास्त असेल.
हा डिवाइस ऑफलाइन स्टोर वर 500 रुपये महाग म्हणजे 10,5999 रुपयांमध्ये विकला जात आहे. पण डिवाइस कंपनी ने 10,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. कंपनी ने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल स्टोर कडून हि बातमी मिळाली आहे. कंपनी ने याआधी नोकिया 6.1 प्लस पण ऑफलाइन स्टोर वर सादर केला होता.
नोकिया 5.1 प्लस चे स्पेसिफिकेशन
फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. या फोन मध्ये 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.86-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनी ने फोन 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट केले आहे.
नोकिया 5.1 प्लस एंडरॉयड 8.1 ओरियो (एंडरॉयड वन) सह सादर केला आहे. एंडरॉयड वन असल्यामुळे फोनला गूगल कडून येणारे एंडरॉयड चे सर्व अपडेट सर्वात आधी मिळतील. म्हणजे काही दिवसांत हा फोन एंडरॉयड पाई वर पण अपडेट होईल. हा फोन 1.8गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक च्या हेलियो पी60 चिपसेट वर चालतो.
नोकिया 5.1 प्लस देशात 3जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे जो 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. नोकिया 5.1 प्लस च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यात एलईडी फ्लॅश सोबत वर्टिकल शेप मध्ये 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तसेच सेल्फी साठी कंपनी ने या फोन मध्ये एआई टेक्नोलॉजी असलेला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.फोन सिक्योरिटी साठी याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.














