2,500 रुपये स्वस्त झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Nokia 6.2, जाणून घ्या नवीन प्राइस

Nokia ने या आठवड्यच्या सुरवातीला भारतीय बाजारात आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन Nokia 2.3 लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनने 8,199 रुपयांमध्ये एंट्री घेतली आहे जो 27 डिसेंबर सेल साठी उपलब्ध होईल. Nokia 2.3 च्या लॉन्च नंतर ब्रँडच्या Nokia 4.2 स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात आली होती ज्यामुळे हा फोन लॉन्च प्राइस पेक्षा 4,000 रुपये स्वस्त मिळत आहे. आता नोकियाच्या अजून एका स्मार्टफोन Nokia 6.2 ची किंमत कमी करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन लॉन्च प्राइस पेक्षा 2,500 रुपये स्वस्तात सेल साठी उपलब्ध झाला आहे.

Nokia 6.2 या नव्या किंमत सह ऑनलाईन शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर लिस्ट केला गेला आहे. हा स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्यात भारतात लॉन्च झाला होता कंपनीने Nokia 6.2 15,999 रुपयांमध्ये बाजारात आणला होता. पण आता अमेझॉन वर मिळणाऱ्या डिस्काउंट नंतर Nokia 6.2 ची किंमत 2,500 रुपयांनी कमी झाली तसेच हा डिवाईस 13,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे Nokia च्या अधिकृत वेबसाइट वर नोकिया 6.2 स्मार्टफोन अजूनही 15,999 रुपयांमध्ये सेल साठी लिस्ट आहे.

Nokia 6.2

Nokia 6.2 च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर यात 6.3-इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे आहे. फोनच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन आहे. तसेच फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर आधारित आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. त्याचबरोबर हा स्मार्टफोन पण एंडरॉयड वन आधारित आहे जो एंडरॉयड 9 पाई सह सादर झाला आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia 6.2 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप राउंड शेप मध्ये आहे. यात एफ/1.8 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Nokia 6.2 मध्ये दोन सिम आणि एक कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी Nokia 6.2 रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3500एमएएमच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Nokia 2.3

ब्रँडच्या लेटेस्ट फोन Nokia 2.3 बद्दल बोलायचे तर या बजेट स्मार्टफोन मध्ये 6.2 इंचाचा एचडी+ (720×1520 पिक्सल) इन-सेल डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे. तर स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी क्वाड-कोर मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसर आहे. Nokia 2.3 मध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 400 जीबी पर्यंत वाढवता येते.

तसेच फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, अपर्चर एफ/2.2 आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिविटी साठी 4जी एलटीई, वाई-फाई 802.11 बी/ जी/एन, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी (v2.0) आणि 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक आहेँ. तर स्मार्टफोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. नोकिया 2.3 स्मार्टफोन एंड्रॉयड 9.0 पाई वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here