एक्सक्लूसिव 28 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होऊ शकतो नोकिया 8.1, ओपो-वीवोला चांगलीच टक्कर देईल हा फोन

नुकतेच एचएमडी ग्लोबलची कंपनी नोकिया ने भारतात चार नवीन मॉडेल सादर केले आहेत. कंपनी ने नोकिया 6.1 प्लस, नोकिया 5.1 प्लस, नोकिया 3.1 प्लस आणि नोकिया 8110 बनाना फोन हे फोन्स आणले होते. हे सर्व फोन 20 हजारांपेक्षा कमी बजेट मध्ये लॉन्च झाले आहेत. तसेच आता कंपनी थोड्या जास्त बजेट वाला फोन मॉडेल आणण्याची तयारी करत आहे. बातमी अशी आहे कि कंपनी लवकरच भारतीय बाजारात नोकिया 8.1 लॉन्च करू शकते. 91मोबाईल्सला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार कंपनी हा फोन 28 किंवा 29 नोव्हेंबरला भारतात लॉन्च करणार आहे आणि याची किंमत 23,999 रुपये असू शकते.

अजूनतरी या फोनच्या स्पेसिफिकेशनची जास्त माहिती मिळाली नाही पण बातमीनुसार हा नुकताच कंपनीने चीन मध्ये लॉन्च केलेला नोकिया एक्स7 असेल. हा फोन भारतात नोकिया 8.1 नावाने लॉन्च केला जाईल. आधी अशी चर्चा सुरु होती कि कंपनी नोकिया एक्स7 ला 7.1 प्लस नावाने भारतात लॉन्च करेल. परंतु काही दिवसांपूर्वी नोकिया 8.1 चा लीक आला आहे ज्यामुळे या फोनच्या भारतीय लॉन्चची शक्यता वाढली आहे.

स्पेसिफिकेशन पाहता नोकिया एक्स7 गेल्याच महिन्यात चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन 18.7:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हा फोन 2,246 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.18-इंचाच्या टीएफटी स्क्रीन सह बाजारात आणण्यात आला आहे. जरी एक्स7 ओरियो वर सादर केला गेला असला तरी भारतात नोकिया 8.1 एंडरॉयड 9 पाई सह येऊ शकतो.

नोकिया एक्स7 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो आणि यात 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे तसेच याचे अजून दोन मॉडेल आहेत ज्यांत 6जीबी रॅम सह 64जीबी मेमरी तसेच 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. भारतात नोकिया 8.1 मॉडेलचे फक्त दोनच वेरियंट येण्याची शक्यता आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 12-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनचा रियर कॅमेरा कार्ल जेसिस लेंस सह चांगली फोटोग्राफी कर शकतो. तसेच नोकिया एक्स7 च्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

नोकिया एक्स7 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देत आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी नोकिया एक्स7 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here