अॅमेझॉननं भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेलचं आयोजन केलं आहे. Amazon India वर हा 6 ऑगस्टला सुरु झाला आहे. अॅमेझॉनच्या सेलमध्ये ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरील जवळपास सर्व कॅटेगरीच्या प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. अॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल दरम्यान स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसवर अनेक डील्स मिळत आहेत. जर तुम्ही तुमच्या घरातील जुना टीव्ही सेट स्मार्ट टीव्हीवर अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर ही बेस्ट वेळ आहे. अॅमेझॉनच्या सेलमध्ये अनेक स्मार्ट टीव्हीजवर डील्स मिळत आहे. पुढे आम्ही अॅमेझॉनवरील सर्वात बेस्ट टीव्ही डील्सची यादी दिली आहे.
Amazon Great Freedom Festival Sale 2022: Best Smart TV Deals
Mi 40” FHD LED Smart TV
भारतीय स्मार्ट टीव्ही बाजारात शाओमीचा दबदबा आहे. शाओमीचा 40 इंचाचा फुलएचडी स्मार्ट टीव्ही अॅमेझॉनच्या सेलमधून स्वस्तात विकत घेता येईल. या टीव्हीमध्ये Netflix, Prime Video, Youtube, Disney+Hotstar सह 5000 पेक्षा जास्त अॅप्स प्ले स्टोरवरून डाउनलोड करता येतात. शाओमीच्या या टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 20W पावरफुल स्टीरियो स्पिकर देण्यात आले आहेत. हा टीव्ही Android TV 9 वर आधारित शाओमीच्या कस्टम PatchWall 4 वर चालतो जो IMDb इंटीग्रेशनसह सादर करण्यात आला आहे.
प्राईस – 29,999 रुपये
डील प्राईस – 18,499 रुपये
LG 43” 4K UHD Smart LED TV
LG च्या 43 इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये 4K Ultra HD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, 3 HDMI पोर्ट, 1 USB पोर्ट, Bluetooth 5.0, Optical आणि Ethernet पोर्ट मिळतो. टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 20W चे स्पिकर देण्यात आले आहेत. हा टीव्ही AI ThinQ & WebOS 22 वर चालतो. तसेच एलजीच्या या टीव्हीमध्ये Game Optimizer देखील मिळतो. यात Netflix, Prime Video, Disney+ Hotstar, Apple TV, SonyLIV, Discovery+, Zee5 सारख्या अल्टीमेट ओटीटी अॅप्सचा सपोर्ट मिळतो.
प्राईस – 44,990 रुपये
डील प्राईस – 27,490 रुपये
Redmi 50” 4K Ultra HD Android Smart LED TV
Redmi च्या 50 इंचाच्या 4K Ultra HD टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल बँड वायफाय, Bluetooth 5.0, 3 HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट मिळतात. तसेच या टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 30W स्पिकर देण्यात आले आहेत, जे Dolby Audio ला सपोर्ट करतात. हा टीव्ही Android TV 10 आधारित PatchWall वर चालतो. रेडमीचा हा टीव्ही Netflix, Prime Video, Disney+ Hotstar सारख्या अॅप्सना सपोर्ट करतो. या टीव्हीमध्ये दमदार पिक्चर क्वॉलिटीसाठी विविड पिक्चर इंजिन देण्यात आलं आहे.
प्राईस – 44,999 रुपये
डील प्राईस – 29,499 रुपये
OnePlus 43” 4K UHD Smart LED TV
OnePlus 43 इंचाचा 4K UHD टीव्ही बॅजल लेस डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये चांगल्या पिक्चर क्वॉलिटीसाठी HDR10+ HDR10, HLG आणि MEMC सह Gamma Engine सपोर्ट देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट आणि ड्युअल बँड वाय-फाय देण्यात आला आहे. यात 24W चे स्पिकर मिळतात. तसेच वनप्लसचा हा टीव्ही वनप्लस कनेक्ट इकोसिस्टमला सपोर्ट करतो. टीव्हीमध्ये Netflix, Youtube, Prime Video, Hotstar, SonyLiv, Hungama, JioCinema, Zee5, Eros Now, Oxygen Play सारख्या अॅप्सचा सपोर्ट मिळतो.
प्राईस – 39,999 रुपये
डील प्राईस – 25,999 रुपये
Westinghouse 43″ UHD 4K TV
Westinghouse 43 इंच UHD 4K TV मध्ये ड्यूरेबल IPS ग्रेड DLED पॅनल देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन UHD 3840 x 2160 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 3 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट मिळतात. या टीव्हीमध्ये Prime Video, Hotstar, Zee5, Sony LIV, YouTube, Prime Video, Hotstar, Zee5, SonyLiv सारखे अॅप्स प्री इंस्टॉल येतात. या टीव्हीमध्ये 40W चे स्पिकर देण्यात आले आहेत.
प्राईस – 33,999 रुपये
डील प्राईस – 18,999 रुपये
TCL 40” FHD Smart LED TV
TCL चा 40 इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही स्लिम डिजाइनसह येतो, ज्यात Full HD रिजोल्यूशन असलेला A+ ग्रेड पॅनल देण्यात आला आहे. हा डिस्प्ले मायक्रो डिमिंग आणि 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. टीसीएलच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI पोर्ट, 1 USB पोर्ट मिळतो. यात 20 Watts आउटपुटसह पावरफुल 2 स्टीरियो स्पिकर देण्यात आले आहेत. या टीव्हीमध्ये 64bit Quad Core प्रोसेसर, 1GB रॅम आणि 8GB स्टोरेज मिळते. यात Prime video, Youtube, Netflix सारख्या अॅप्सचा सपोर्ट देण्यात आला आहे.
प्राईस – 40,990 रुपये
डील प्राईस – 17,490 रुपये
Samsung 43” Crystal 4K Ultra HD Smart LED TV
सॅमसंगच्या 43″ स्मार्ट टीव्हीमध्ये 4K प्रो UHD (3840 x 2160 पिक्सल) डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. सॅमसंगच्या या स्मार्ट टीव्हीचे टॉप फिचर्स पाहता यात व्हॉइस असिस्टंट्स, स्मार्ट रिमोट, आणि PC मोड, स्क्रीन मिररिंग, टॅप व्यू मोड मिळतो. सॅमसंगचा हा स्मार्ट टीव्ही टायझन ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, सोनी लिव्ह, झी5, युट्युब सारखे अॅप्स प्री-इंस्टॉल मिळतात. या टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 20W चे स्पिकर देण्यात आले आहेत जी डॉल्बी डिजिटल प्लसला सपोर्ट करतात.
प्राईस – 47,900 रुपये
डील प्राईस – 32,490 रुपये
iFFALCON 32” HD Ready Smart LED TV
iFFALCON स्मार्ट टीव्हीमध्ये 32 इंचाचा LED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1366×768 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI पोर्ट, 1 USB पोर्ट, IR पोर्ट देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये साउंड आउटपुटसाठी 16W चे स्पिकर मिळतात. या टीव्हीमध्ये Google व्हॉईस सर्च, Google App Store सारखे फीचर मिळतात. यात Google Play Store देण्यात आला आहे, जिथून अनेक अॅप्स डाउनलोड करता येतात. टीव्हीमध्ये आधीपासून YouTube, Google cast, Netflix सारखे अॅप्स प्री-इंस्टॉल मिळतात.
प्राईस – 26,990 रुपये
डील प्राईस – 9,899 रुपये
Acer 43” 4K Ultra HD Android Smart LED TV
Acer चा 43 इंचाचा 4K टीव्ही अॅमेझॉनवर सुरु असलेल्या ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेलमध्ये स्वस्तात विकत घेता येईल. हा स्मार्ट टीव्ही Android 11 प्लॅटफॉर्मवर चालतो. यात Dual Band Wifi, 2-वे Bluetooth सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्हीमध्ये ब्लू लाईट रिडक्शन इंटेलिजंट फ्रेम स्टॅबिलायजेशन इंजिन आणि डायनॅमिक सिग्नल कॅलिब्रेशन सारखे फीचर मिळतात. एसरच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये Netflix, Youtube, Prime Video, Amazon Music, Hotstar,Spotify, Voot, VootKids, MxPlayer, SonyLiv, Hungama, Zee5, Eros Now सारखे अॅप्स प्री इंस्टॉल देण्यात आले आहेत.
प्राईस – 39,999 रुपये
डील प्राईस – 25,499 रुपये
Amazon Basics 55’’ 4K UHD LED Fire TV
अॅमेझॉनच्या ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेलमध्ये 55 इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही स्वस्तात विकत घेता येईल. या टीव्हीच्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन 3840 x 2160 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. अॅमेझॉन बेसिकच्या या टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI 2.0 पोर्ट, 1 USB 3.0 आणि 1 USB 2.0 पोर्ट IR पोर्ट देण्यात आले आहेत. यात साउंड आउटपुटसाठी 20W चे पावरफुल स्टीरियो स्पिकर मिळतात. हा टीव्ही अॅमेझॉनच्या Fire TV OS वर चालतो, ज्यात Netflix, Disney + Hotstar, YouTube सारखे अॅप्स प्रीइंस्टॉल देण्यात आले आहेत.
प्राईस – 60,000 रुपये
डील प्राईस – 31,249 रुपये














