Nokia ने या महिन्याच्या सुरवातीला अंर्तराष्ट्रीय बाजारात स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.3 लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन Nokia 2.2 चा अपग्रेडेड वर्जन आहे जो 4000एमएएच बॅटरी आणि एंडरॉयड 10 रेडी ओएस सह आला होता. आता ग्लोबल मार्केट मध्ये आपल्या स्मार्टफोन्सची संख्या वाढवत आज Nokia चे मालकी असणाऱ्या टेक कंपनीने अजून एक नवीन डिवाईस Nokia C1 पण लॉन्च केला आहे.
Nokia C1 कंपनीने ग्लोबल मंचावर सादर केला गेला आहे जो आफ्रिका व मध्यपूर्व देशांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. Nokia C1 ब्रँडचा लो बजेट फोन आहे जो एंट्री लेवल स्पेसिफिकेशन्स सह आला आहे. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये 5.45 इंचाचा एफडब्ल्यूवीजीए+ आईपीएस डिस्प्ले दिला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल बटन नाही. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला स्पीकर आणि सेल्फी कॅमेरा तसेच फ्लॅश लाईट आहे.
Millions of consumers across markets in Africa, Middle East and APAC will upgrade from a feature phone to their first smartphone. Nokia C1 is a smartphone they can trust – bringing quality experiences at an affordable price with 3G connectivity #nokiamobile pic.twitter.com/QibUYWxRTn
— Juho Sarvikas (@sarvikas) December 11, 2019
Nokia C1 कपंनीने एंडरॉयड 9 पाई गो एडिशन वर सादर केला आहे जो बाजारात आल्यानंतर काही दिवसांनी एंडरॉयड 10 वर अपडेट होईल. हा स्मार्टफोन 1.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या क्वॉडकोर प्रोसेसर वर चालतो. Nokia C1 मध्ये चिपसेट कोणता असेल याची आतातरी माहिती समोर आली नाही. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia C1 च्या बॅक पॅनल वर एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो फ्लॅश लाईट सह येतो.
सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Nokia चा हा स्वस्त स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फ्लॅश लाईट सह येतो. Nokia C1 मध्ये 1 जीबी रॅम देण्यात आला आहे सोबतच हा फोन 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 64 जीबी पर्यंत वाढवता येते. Nokia C1 मध्ये एफएम रेडियो सह 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे.
Nokia C1 मध्ये पावर बॅकअप साठी 2500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी माइक्रो यूएसबीने चार्ज करता येईल. नोकिया सी1 एक डुअल सिम फोन आहे. विशेष म्हणजे Nokia C1 मध्ये 4G कनेक्टिविटी ननाही तर हा फोन फक्त 3G ला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनची साईज 147.6 x 71.4 x 8.7एमएम आहे तर फोनचे वजन 155ग्राम आहे. एचएमडी ग्लोबलने हा फोन ब्लॅक आणि रेड कलर मध्ये लॉन्च केला आहे.















