Exclusive: HMD Pulse Pro चे स्पेसिफिकेशन आणि किंमत आली समोर, पाहा अशी असेल डिझाईन

एका रिपोर्टमध्ये HMD च्या अगामी डिव्हाईसची लिस्ट समोर आली होती. त्यामधील एक HMD Pluse Pro स्मार्टफोन पण होता, ज्याला घेऊन आमच्याकडे एक्सक्लूसिव्ह माहिती आली आहे. 91mobiles ला लीकस्टर OnLeaks च्या सहयोगाने अगामी HMD फोनची किंमत, रेंडर आणि स्पेसिफिकेशन बाबत माहिती मिळाली आहे. तसेच, लीकमध्ये समोर आलेली माहिती पाहता फोनमध्ये 90Hz डिस्प्ले, 50MP फ्रंट आणि मुख्य कॅमेरा, 5,000mAh बॅटरी आणि खूप काही असण्याची शक्यता आहे.

HMD Pulse Pro किंमत आणि स्पेसिफिकेशन लीक

HMD Pulse Pro ला कमीत कमी 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह लाँच केले जाईल आणि याची किंमत EUR 179 म्हणजे जवळपास 15,900 रुपये ठेवली जाऊ शकते.

स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर एचएमडी फोनमध्ये 1480×720 पिक्सल रिजोल्यूशन सह 6.56-इंचाचा आयपीएस 90 हर्ट्झ डिस्प्ले असेल. हा Unisoc T606 SoC सह कमीत कमी 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह असेल.

तसेच HMD Pulse Pro मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या सेटअपमध्ये 50-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असेल. तसेच सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी डिव्हाईसमध्ये फ्रंटला 50-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर असेल.

तसेच या अगामी Pulse Pro मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल. फास्ट चार्जिंगबद्दल लीकमध्ये कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच, HMD phone मध्ये IP52 रेटिंग आणि 3.5mm हेडफोन जॅक असेल आणि याचे वजन 196 ग्रॅम असू शकते.

HMD Pulse Pro रेंडर्स

डिझाईन पाहता HMD Pulse Pro मध्ये फ्लॅट डिस्प्ले मिळेल, ज्यात खूप पातळ बेजल्स आणि सेंटरवर पंच होल दिला जाईल. तसेच, फोनच्या उजवीकडे वॉल्यूम आणि पावर बटन दिले आहेत. तसेच फोनच्या बॉटमची झलक रेंडर्समध्ये आली नाही. परंतु, आम्ही सांगतो की यात 3.5mm जॅक असेल.

रिअर लुक पाहता HMD Pulse Pro मध्ये टेक्सचर फिनिश देखने पाहायला मिळते, ज्याला चांगली ग्रिप मिळेल. तसेच, यात रेक्टेंगुलर कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यात दोन सर्कुलर सेन्सर आणि एक एलईडी प्लॅश लाईट टॉप डाव्या कॉर्नरवर दिला आहे. तसेच, मागे मध्ये तुम्हाला HMD ची ब्रँडिंग पण मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here