
Tecno Phantom X2 Pro 5G स्मार्टफोन गेल्याच महिन्यात जागतिक बाजारात लाँच करण्यात आला होता. या सीरिजमधील Tecno Phantom X2 5G याच महिन्यात भारतात आला आहे. तर आता या सीरिजमधील जास्त पावरफुल व्हर्जन भारतीयांच्या भेटीला आहे. Tecno Phantom X2 Pro 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 9000 SoC वर चालतो आणि 120Hz AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात एक खास रिट्रॅक्टेबल पोर्ट्रेट लेन्स देण्यात आली आहे, जी DSLR च्या लेन्स प्रमाणे गरजेनुसार अॅड्जट्स करता येते.
Tecno Phantom X2 Pro 5G price in India
Tecno Phantom X2 Pro 5G स्मार्टफोनचा एकच मॉडेल भारतीय बाजारात आला आहे. ज्यात 12GB रॅम व 256GB स्टोरेज देण्यात आली आहे, ज्याची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोन मार्स ऑरेंज आणि स्टारडस्ट ग्रे कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. सध्या हा फोन भारतात Amazon वर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे आणि याची विक्री 24 जानेवारीपासून सुरु होईल. हे देखील वाचा: स्वस्तात शॉपिंग आणि एंटरटेनमेंटही! कमी किंमतीत Amazon Prime Lite मेंबरशिप लाँच; इतकी आहे किंमत
Tecno Phantom X2 Pro चे स्पेसिफिकेशन्स
- 6.8 इंचाचा FHD+ 120Hz डिस्प्ले
- Dimensity 9000 5G प्रोसेसर
- 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज
- 50MP कॅमेरा, OIS
- 32MP सेल्फी कॅमेरा
- 5160mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग
Tecno Phantom X2 प्रमाणे प्रो मॉडेलमध्येही 6.8 इंचाचा FHD+ Curved Display देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे आणि Corning Gorilla Glass Victus Protection सपोर्टसह येतो. यात देखील मीडियाटेकचा Dimensity 9000 5G प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Mali-G710 MC10 GPU मिळतो. तसेच अँड्रॉइड 12 आधारित HiOS 12.0 आहे.
Tecno Phantom X2 Pro स्मार्टफोनमध्ये 12GB का रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. जोडीला 5GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.3, GPS, आणि USB Type-C पोर्ट आहे. तसेच फोनमध्ये Vapor Chamber Cooling System आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 456KM सह लाँच झाली Mahindra XUV400 EV; इतकी आहे किंमत
Tecno Phantom X2 Pro स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. या फोनच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह 50MP ची जगातील पहिली रीट्रॅक्टेबल पोर्टेट लेन्स आणि 13MP चा तिसरा सेन्सर देण्यात आला आहे. या टेक्नो स्मार्टफोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. Tecno Phantom X2 Pro मध्ये 5160mAh ची बॅटरी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
















