13 वर्षांनंतर पुन्हा लॉन्च होत आहे नोकिया ‘एन सीरीज’

मागच्या वर्षी एचएमडी ग्लोबल ने नोकिया ब्रांड चा सर्वात प्रसिद्ध मोबाईल फोन नोकिया 3310 नवीन रुपात बाजारात आणला होता. नवीन नोकिया 3310 4जी फीचर फोन च्या रुपात रि-लॉन्च झाला होता, जो खुप लोकांना आवडला. नोकिया 3310 नंतर यावर्षी एमडब्ल्यूसी ने नोकिया 8110 4जी को रि-लॉन्च केला आहे तर आता बातमी येत आहे की कंपनी लवकरच नोकिया ची सुपरहिट ‘एन सीरीज’ नवीन रंग-रूप आणि नवीन ढंगात लॉन्च करणार आहे.

नोकिया ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट करून अधिकृत घोषणा केली आहे की एचएमडी ग्लोबल नोकिया एन सीरीज लॉन्च करणार आहे. नोकिया ने या गोष्टीकडे इशारा केला आहे की या ईवेंट मध्ये एन सीरीज सोबत कंपनी अन्य मोबाईल फोन पण लॉन्च करेल. पण अजून याविषयी काहीच बोलता येणार नाही की हे फोन एंडरॉयड आधारित असतिल की फीचर फोन, किंवा मग कंपनी आपली नवीन एन सीरीज फीचर व एंडरॉयड दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोंस सह बाजारात आणेल.

वेईबो वरील पोस्ट मध्ये नोकिया ने लिहले आहे की कंपनी आज म्हणजे 27 एप्रिल पासून 2 मे पर्यंत चीन मध्ये एका ईवेंट चे आयोजन करेल. हा ईवेंट 6 दिवस चालेल आणि रोज कंपनी कोणती ना कोणती तरी नवीन घोषणा करेल. या नवीन घोषणांमध्ये कंपनी च्या नवीन फोन व अन्य डिवाईस चा समावेश असेल. तसेच या ईवेंट च्या शेवटच्या दिवशी म्हणजे 2 मे ला नोकिया नवीन एन सीरीज पण सादर करेल.

टेक जगात चर्चा आहे की या ईवेंट मध्ये नोकिया एन सीरीज अंतर्गत नोकिया एन8 फोन नवीन अपडेट व फ्लेवर्स सह लॉन्च करणार आहे. सध्यातरी नोकिया द्वारा रि-लॉन्च होत असलेल्या ‘एन सीरीज’ च्या मोबाईल फोंस च्या इतर माहितीसाठी नोकिया च्या आॅफिशियल घोषणेची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here