Nokia ब्रँडच्या स्मार्टफोन्स बनवणाऱ्या कंपनीने HMD ग्लोबल लवकरच साल 2020 चा आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे जो एंडरॉयड 10 वर आधारित असेल. डिवाइस रशिया आणि इंडियन सर्टिफिकेशनस प्लेटफॉर्म वर दिसला आहे. डिवाइस मॉडेल नंबर ‘TA-1234’ सह दिसला आहे.
कंपनी हा फोन एंडरॉयड 10 सह डुअल बँड वाई-फाई कनेक्टिविटी सह सादर करेल जी सध्या सर्व स्मार्टफोन्सची गरज आहे. तसेच कंपनी हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 SoC सह सादर करू शकते जो याला एक मिड-रेंज फोन बनवेल. Nokia TA-1234 ला आता रशियन EEC सर्टिफिकेशन मिळाले आहे. तसेच डिवाइसचे वाई-फाई सर्टिफिकेशन पण क्लियर झाले आहे जे BIS च्या अंतर्गत येते. यावरून अंदाज लावला जात आहे कि फोन दोन मार्केट मध्ये सादर केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त या मिड-रेंज नोकिया स्मार्टफोन बद्दल इतर कोणतीही माहिती समोर आली नाही.
अलीकडेच HMD Global चे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर Juho Sarvikas यांनी एक ट्वीट केले होते. या ट्वीट मध्ये त्यांनी Adidas Originals चे स्नीकर्सचा फोटो पोस्ट केला होता. सोबत त्यांनी लिहले आहे कि मला हि Adidas Originals ची लिमिटेड एडिशन जोडी मिळाली आहे. याचा अर्थ असा आहे कि आपल्याला नवीन नोकिया ऑरिजनल फोन लॉन्च केला पाहिजे.
Juho Sarvikas यांच्या या ट्वीट नंतर बोलले जात आहे कि कंपनी आपला जुना फोन पुन्हा एकदा सादर करू शकते. याआधी पण कंपनीने असे केले आहे. एकेकाळी नोकिया मोबाईल फोनच्या दुनियेत लोकप्रिय होती. पण गेल्या काही वर्ष कंपनी आपले सिंहांसन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यावर्षी मोबाईल वर्ल्ड कांग्रेस म्हणजे MWC2020 ची सुरवात 24 फेब्रुवारीला होत आहे. आतापर्यंत कंपनीने Nokia 3310, Nokia 8110 4G आणि Nokia 2720 4G री लॉन्च केले आहेत.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Nokia 1.3 ब्लूटूथ एसआईजी वेबसाइट वर दिसला होता. फोनची लिस्टिंग डेट वेबसाइट वर 20 डिसेंबर 2020 ची होती. ब्लूटूथ एसआईजी वर हा आगामी नोकिया फोन Nokia TA-1213 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता जो ब्रँडचा आगामी डिवाईस Nokia 1.3 बोलला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार Nokia 1.3 कंपनीच्या आधीच्या स्मार्टफोन Nokia 1 Plus चा अपग्रेेडेड मॉडेल असेल.















