Nokia चा नवीन डाव, भारतात लॉन्च केली ब्रँडची पहिली Smart TV, Xiaomi-OnePlus ला मिळेल टक्कर

अनेक दिवसांच्या चर्चेनंतर आज टेक कंपनी Nokia ने भारतात नव्या स्ट्रॅटेजीची सुरवात केली आहे. अनेक दिवस बातम्या येत होत्या कि Nokia पण भारतात आपली Smart TV लॉन्च करेल. आज भारतीय टेलीविजन बाजारात आपले नशीब आजमावत Nokia ने ब्रँडचा पहिला स्मार्ट टेलीविजन लॉन्च केला आहे. Xiaomi, OnePlus आणि Motorola सारख्या ब्रँड्स नंतर आता Nokia पण त्या मोबाईल ब्रँड्स मध्ये सामील झाली आहे ज्यांचे टेलीविजन पण आता बाजारात आलेत. Nokia Smart TV येत्या 10 डिसेंबर पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल.

किंमत व सेल

Nokia ने या टेलीविजनसाठी ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट सोबत भागीदारी केली आहे आणि या Smart TV ची विक्री पण या शॉपिंग साइट वर होईल. फ्लिपकार्ट वर Nokia Smart TV चे प्रोडक्ट पेज लाईव करण्यात आले आहे जिथे टीव्हीच्या सेलची तारीख 10 डिसेंबर सांगण्यात आली आहे. Nokia Smart TV कपंनीने 41,999 रुपयांमध्ये लॉन्च केली आहे आणि 10 डिसेंबर पासून हा टेलीविजन फ्लिपकार्टवरून येईल. फ्लिपकार्ट Nokia Smart TV च्या खरेदीवर बँक क्रेडिट व डेबिट वापरल्यास थेट 2,000 रुपयांचा डिस्काउंट पण मिळेल.

शानदार साउंड क्वॉलिटी

Nokia Smart TV सोबत JBL ने टेलीविजन प्रोडक्ट मध्ये भागेदारी केली आहे. Nokia Smart TV मध्ये JBL चे स्पीकर्स देण्यात आले आहेत जे Dolby Audio आणि DTS TruSurround ला सपोर्ट करतात. Nokia Smart TV साउंडच्या बाबतीत खास आहे. या टीव्ही मध्ये क्लियर वोकल टोन आणि मिनिमल हारमोनिक डिस्ट्रोशनचा शानदार अनुभव मिळेल तसेच हा नोकिया स्मार्टटीव्ही 5.1 सराउंड साउंडला सपोर्ट करतो.

Nokia Smart TV

स्मार्टटीव्हीचे स्पेसिफिकेशन्स पाहता Nokia Smart TV 55 इंचाच्या 4K UHD LED डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे जो डॉल्बी विजनला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे कि हा डिस्प्ले चांगल्या रंगांसह इंटेलिजेंट डीमिंगचा अनुभव देते. कंपनीने हा टेलीविजन एंडरॉयड 9 पाई वर केला गेला आहे जो बिल्ट इन क्रोमकॉस्ट सह चालतो.

नोकियाच्या या स्मार्टटीव्ही मध्ये मोबाईल प्रमाणे डेटा सेविंग मोड पण आहे. यूजरच्या सोयीसाठी कंपनीने Nokia Smart TV गूगल असिस्टेंटने सुसज्ज केलाआहे. Nokia Smart TV मध्ये Netflix आणि YouTube साठी शार्टकट बटन पण आहेत. हा टेलीविजन 2.25जीबी रॅमला सपोर्ट करतो तसेच प्रोसेसिंग साठी Nokia TV मध्ये PureX क्वॉड-कोर प्रोसेसर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here