4,700mAh battery सह Nothing Phone (2) जुलैमध्ये होईल लाँच, Carl Pei नं केलं कन्फर्म

Highlights

  • Carl Pei नं एका इंटरव्यूमध्ये फोन लाँच टाइमलाइन कंफर्म केली आहे.
  • Nothing Phone (2) मध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर असेल.
  • Nothing Phone (2) मध्ये 12GB RAM मिळू शकतो.

Nothing Phone (2) च्या लाँचवर कंपनीनं खूप आधीच शिक्कामोर्तब केला होता. आता कंपनी सीईओनी लेटेस्ट इंटरव्यू दरम्यान या फोनची लाँच टाइमलाइन कंफर्म केली आहे. इतकेच नव्हे तर सीईओ Carl Pei नं लाँचपूर्वीच ह्या फोनच्या बॅटरी फीचर्सचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे याआधी कंफर्म झालं आहे की फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येईल.

नथिंग फोन (2) लाँच टाइमलाइन आणि बॅटरी डिटेल्स

Nothing चे सीईओ Carl Pei यांनी Forbes ला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये फोन बाबत महत्वाची माहिती शेयर केली आहे. ह्या इंटरव्यू दरम्यान सीईओनी सांगितलं आहे की हा डिवाइस जुलैमध्ये लाँच केला जाईल. तसेच, नथिंगचा हा फोन 4700mAh बॅटरीसह येईल.

नथिंग फोन (2) उपलब्धता

तसेच Pei नं इंटरव्यूमध्ये सांगितलं आहे की Phone (2) यूएससह ग्लोबली उपलब्ध होईल. गेल्यावर्षी Phone (1) ग्लोबली लाँच झाल्यानंतर देखील अनेक महिने यूएसमध्ये उपलब्ध झाला नाही. तसेच ह्याआधी कार्ल पेईनी सांगितलं होतं की हा फोन प्रीमियम सेगमेंटमध्ये येईल. तसेच ह्यावेळी कंपनी यूएस मार्केटवर लक्ष देणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

नथिंग फोन (2) चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • लीकनुसार, Nothing Phone (2) मध्ये 120हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो.
  • नथिंग फोन 12जीबी रॅम आणि 8जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो.
  • तसेच, फोनचा 256जीबी आणि 512जीबी स्टोरेज व्हेरिएंट बाजारात येऊ शकतो.

नथिंग फोन (2) डिजाइन (लीक)

Nothing Fold (2) मध्ये ट्रान्सपरंट बॉडी मिळू शकते. हा फोन पहिल्या व्हर्जन प्रमाणे ग्लिफ लाइटिंग फीचरसह येऊ शकतो, अशी चर्चा आहे. ह्या वेगवेगळ्या रंगाच्या लाइट्स बाहेरून दिसत नाहीत परंतु कॉल किंवा नोटिफिकेशन आल्यावर चमकतात. तसेच ह्या फोनमध्ये वनप्लसच्या अलर्ट स्लाइडर प्रमाणे वेगळा डेडिकेटेड बटन देखील मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here