Nothing Phone (2) ची लीक इमेज आली समोर, पाहा कसा असेल हा फोन

Highlights

  • लीकमध्ये डिवाइसचा कॅमेरा मॉड्यूल पाहता येईल.
  • कॅमेऱ्याच्या बाजूला ड्युअल एलईडी फ्लॅश देखील दिसत आहे.
  • ह्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळू शकते.

Nothing कंपनीचा बहुचर्चित स्मार्टफोन Nothing Phone (2), 11 जुलैला लाँच होणार आहे. परंतु त्याआधीच स्मार्टफोनबद्दल अनेक लीक आणि रेंडर समोर आले आहेत. तसेच आजच्या लीकमध्ये टिपस्टरनं ह्या फोनची एक इमेज शेयर केली आहे ज्यात डिवाइसचा कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. चला जाणून घेऊया ह्याबाबत साविसात.

Nothing Phone (2) कॅमेरा लीक डीटेल

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर टिपस्टर पारस गुगलानीनं नथिंग फोन 2 ची इमेज शेयर केली आहे. इमेजमध्ये पाहता येईल की स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. तसेच कॅमेऱ्याच्या बाजूला ड्युअल एलईडी फ्लॅश देखील स्पष्टपणे दिसत आहे. तसेच वरच्या बाजूला एक सेन्सर आहे जो कदाचित मायक्रोफोन असू शकतो.

फोनची डिजाइन पाहता डिवाइस जुन्या नथिंग फोन 1 सारखाच दिसत आहे. फोटोमध्ये पाहू शकता की ह्यात फ्लॅट एज देण्यात आले आहेत. तसेच पूर्वीप्रमाणे ट्रान्सपरंट डिजाइन आणि बॅक पॅनलवर एलईडी लाइट फीचर असल्यामुळे जुन्या फोनचा भास होत आहे.

Nothing Phone (2) चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: नथिंग फोन (2) मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्या खास डिस्प्लेवर 120Hz रिफ्रेश आणि हाय रिजॉल्यूशन दिला जाऊ शकतं. सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळू शकतो.
  • प्रोसेसर: चांगल्या परफॉर्मन्ससाठी ह्या फोनमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशन असलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 ऑक्टा कोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. जो गेमिंग आणि इतर कामांसाठी चांगला ठरू शकतो.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत नवीन नथिंग फोन 2 दोन किंवा तीन स्टोरेज ऑप्शनसह येण्याची शक्यता आहे. ज्यात 8जीबी रॅम + 256जीबी इंटरनल स्टोरेज आणि 12GB रॅम + 256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच 8GB + 256GB व्हेरिएंट देखील येऊ शकतो.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत फोन 4,700एमएएचची दीर्घकाळ चालणारी बॅटरी मिळू शकते.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता हा फोन ड्युअल कॅमेरा सह येऊ शकतो. ह्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळू शकते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
  • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here