ट्रान्सपरंट बॉडी असलेला Nothing Phone (2) भारतात लाँच; सुधारित डिजाइन आणि ताकदही वाढली

Highlights

  • Nothing Phone (2) भारतासह जागतिक बाजारात आला आहे.
  • आता बॅक पॅनलमध्ये 33 एलईडी लाइट जास्त आहेत.
  • फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेट मिळतो.

नथिंग कंपनीचा दुसरा ट्रान्सपरंट स्मार्टफोन Nothing Phone (2) भारतात लाँच झाला आहे. डिवाइसमध्ये आधीपेक्षा चांगली डिजाइन आणि दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. फोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरु होईल. चला जाणून घेऊया स्पेसिफिकेशन्स, फीचर्स, किंमत आणि डिजाइनची माहिती.

Nothing Phone (2) डिजाइन

हा डिवाइस ट्रान्सपरंट बॅक पॅनलसह आला आहे. ह्यात जास्त एलईडी लाइट्स देण्यात आल्या आहेत. कॅमेरा मॉड्यूलमध्ये देण्यात आलेली फ्लॅश लाइट देखील मोठी आहे. डिवाइसच्या उजवीकडे पावर बटन मिळतो तर वॉल्यूम अप-डाउन बटन डावीकडे देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर आधीच्या तुलनेत 33 एलईडी लाइट जास्त आहेत.

Nothing Phone (2) स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनमध्ये 6.7 इंचाचा एफएचडी प्लस ओएलईडी LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेवर 120Hz रिफ्रेश रेट आणि हाय रिजॉल्यूशन, HDR 10+, 10 बिट कलर, 240Hz टच सॅम्पलिंग रेट टेक्नॉलॉजी सारखे फीचर्स आहेत. सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देखील आहे.
  • प्रोसेसर : नवीन नथिंग फोनमध्ये बेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेट मिळतो. हा प्रोसेसर 4 नॅनोमीटर प्रोसेसवर चालतो तसेच चांगल्या ग्राफिक्ससाठी एड्रिनो 720 जीपीयू आहे.
  • स्टोरेज : डिवाइस 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येतो.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ह्यात 50 मेगापिक्सलचा IMX890 प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. जोडीला 50 मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

  • बॅटरी : कंपनीनं 4700एमएएचची बॅटरी दिली आहे. जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
  • ओएस : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित Nothing OS 2.0 वर चालतो.
  • सुरक्षा : फोनमध्ये सुरक्षेसाठी ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आणि आयपी रेटिंग सादर करण्यात आली आहे. तसेच युजर्सना फोनमध्ये 3 वर्ष अँड्रॉइड अपडेट आणि 4 वर्ष सिक्योरिटी अपडेट्स मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here