Nothing Phone 2 च्या लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स आणि किंमत झाली लीक, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Highlights

  • Nothing Phone (2) 11 जुलैला सादर होणार आहे.
  • ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेट असू शकतो.
  • 50 मेगापिक्सलची IMX890 प्रायमरी लेन्स मिळू शकतो.

नथिंग कंपनीचा दुसरा स्मार्टफोन Nothing Phone 2, 11 जुलैला सादर होण्यासाठी तयार आहे. ज्याची टीजर इमेज कंपनीनं शेयर केली आहे. आता डिवाइसच्या लाँचपूर्वीच टिपस्टरनं फोनच्या फुल स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. जी तुम्ही पुढे वाचू शकता.

Nothing Phone (2) किंमत (लीक)

टिप्स्टरनुसार हा फोन 42,000 किंवा 43,000 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. विशेष म्हणजे ही किंमत फोनच्या टॉप मॉडेलची असू शकते. ज्यात 8GB रॅम + 256GB स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच बेस व्हेरिएंट सुमारे 38,000 रुपयांपर्यंत सादर केला जाऊ शकतो.

Nothing Phone (2) स्पेसिफिकेशन्स (लीक)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर टिपस्टर योगेश ब्रारनं Nothing Phone (2) चे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमत सांगितली आहे.

  • डिस्प्ले : फोनचा डिस्प्ले पाहता ह्यात 6.7 इंचाचा एफएचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. डिस्प्लेवर 120Hz रिफ्रेश रेट आणि हाय रिजॉल्यूशन असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  • प्रोसेसर : नवीन फोनचा प्रोसेसर पाहता ह्यात इंडस्ट्रीचा बेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेट दिला जाऊ शकतो.
  • सुरक्षा : फोनमध्ये सुरक्षेसाठी ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आणि आयपी रेटिंग दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ह्यात 50 मेगापिक्सलची IMX890 प्रायमरी कॅमेरा लेन्स OIS सपोर्टसह दिली जाऊ शकते. तसेच 50 मेगापिक्सलचा (UW) (JN1) सेन्सर मिळू शकतो.
  • बॅटरी : डिवाइस 4700एमएएचची बॅटरी सपोर्टसह येऊ शकतो. ह्या बॅटरीसह 33W किंवा 15W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • ओएस : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित Nothing OS 2.0 वर चालू शकतो.
  • अन्य : फोनमध्ये युजर्सना 3+4 वर्षांचे सिक्योरिटी आणि ओएस अपडेट्स दिले जाऊ शकतात.
  • स्टोरेज : स्टोरेज ऑप्शन बाबत ह्या लीकमध्ये माहिती मिळाली नाही, परंतु हा डिवाइस 8GB पर्यंत रॅम + 256 जीबी इंटरनल स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here