डायमेंसिटी 7350 प्रो चिपसेटसह Nothing Phone (2a) Plus झाला लाँच, जाणून घ्या किंमत

नथिंगने 31 जुलैला भारतात Nothing Phone (2a) Plus स्मार्टफोन लाँच केला आहे. हा मीडियाटेक डायमेंसिटी 7350 प्रो चिपसेटसह येणारा जगातील पहिला फोन आहे. यात आधीच्या मॉडेल 2 ए पेक्षा चांगले स्पेक्स आहेत. तसेच ब्रँड हा फोनच्या यूनिक लूकसाठी ओळखला जातो. यामुळे जर तुम्ही नवीन डिव्हाईसच्या शोधामध्ये आहात तर हा चांगला ऑप्शन बनू शकतो. चला, पुढे तुम्हाला किंमत, ऑफर आणि स्पेसिफिकेशन सविस्तर सांगतो.

Nothing Phone (2a) Plus ची किंमत, ऑफर आणि उपलब्धता

  • नथिंग फोन (2 ए) प्लसची किंमत 8GB+128GB व्हेरिएंटसाठी 27,999 रुपये आहे. तर 12GB+256GB ऑप्शन 29,999 रुपयांचा आहे.
  • हा दोन रंगामध्ये येतो ज्यात ब्लॅक आणि ग्रे चा समावेश आहे.
  • डिव्हाईस भारतात फ्लिपकार्ट, क्रोमा, विजय सेल्स आणि इतर रिटेल पार्टनर्सच्या माध्यमातून विकत घेता येईल.
  • ग्राहक निवडक बँक कार्डचा उपयोग करून 2,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट पण घेऊ शकतात.

Nothing Phone (2a) Plus चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Nothing Phone (2a) Plus फोनमध्ये 6.7 इंचाचा अ‍ॅमोलेड FHD+ डिस्प्ले आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट, 1300 निट्स ब्राईटनेस काला सपोर्ट मिळतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन लावण्यात आले आहे.
  • प्रोसेसिंग: नथिंग फोन (2 ए) प्लस MediaTek Dimensity 7350 Pro चिपसेटसह आहे. त्याचबरोबर लाँच होणारा हा पहिला फोन आहे. ब्रँडनुसार नवीन फोन पूर्व (2a) च्या तुलनेत 10 टक्के चांगला परफॉरमेंस देईल.
  • स्टोरेज आणि रॅम: हा मोबाईल दोन मेमरी ऑप्शनमध्ये येतो. ज्यात 8GB आणि 12 जीबी LPDDR4x रॅम आणि 128GB आणि 256GB UFS 2.2 इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.
  • कॅमेरा: फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तर मागे OIS सह 50 मेगापिक्सलचा Samsung S5KGN9 सेन्सर आणि 50 मेगापिक्सलचा Samsung S5KJN1 अल्ट्रावाइड सेन्सर असलेला ड्युअल कॅमेरा मिळतो.
  • बॅटरी: Nothing Phone (2a) Plus मध्ये 50W चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी आहे.
    ओएस: हा नथिंग OS 2.6 सह Android 14 वर चालतो. याला तीन OS अपग्रेड आणि चार वर्षाचे सुरक्षा पॅच अपडेट मिळतील.
  • इतर: फोन IP54 रेटिंगसह आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्पिकर, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.3, 5G सपोर्ट, 13 5 जी बँड्सचा सपोर्ट, 4 जी LTE सारखे ऑप्शन मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here