टेक्नॉलॉजीला मर्यादा नसतात. स्मार्टफोन विश्वात पण काही ना काही नवीन होत असते ज्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. आज एकीकडे अशी बातमी आली आहे कि एक टेक कंपनी 10,000mAh ची पावरफुल बॅटरी असलेला स्मार्टफोन घेऊन येणार आहे तर दुसरीकडे अजून एका टेक ब्रँडने 16 जीबी रॅम असलेला एक दमदार स्मार्टफोन टेक्नॉलॉजी विश्वासमोर सादर केला आहे. हा मोबाईल ZTE च्या सब-ब्रँड nubia ने सादर केला आहे जो भारतात कदाचित उपलब्ध होणार नाही पण तरीही या फोन मध्ये वापरण्यात आलेल्या टेक्नोलॉजीने जगाचे लक्ष वेधले आहे.
Nubia Red Magic 5S
नुबियाने आपला हा पावरफुल फोन रेड मॅजिक 5एस नावाने टेक मंचावर सादर केला आहे. थेट स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.65 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 144हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा डिस्प्ले बेजल लेस आहे ज्यात कोणतीही नॉच नाही.
Nubia Red Magic 5S एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो रेडमॅजिक ओएस वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 650 जीपीयू ला सपोर्ट करतो तसेच हेवी गेमिंगसाठी या फोन मध्ये GPU BOOST टेक्नोलॉजी आणि स्मूद प्रोसेसिंगसाठी मल्टी-डाइमेंसनल कूलिंग सिस्टम ICE 4.0 देण्यात आली आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nubia Red Magic 5S ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX686 सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी नुबिया रेड मॅजिक 5एस मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Nubia Red Magic 5S डुअल सिम फोन आहे जो डुअल 4G वोएलटीई सोबत डुअल मोड 5G ला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी रेड मॅजिक 5एस मध्ये 55वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने हा फोन Sonic Silver आणि Pulse कलर वेरिएंट मध्ये बाजारात आणला आहे.
किंमत
Nubia Red Magic 5S कंपनीने तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. यातील सर्वात मोठी चर्चेची बाब म्हणजे फोनचा 16 जीबी रॅम वेरिएंट 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या वेरिएंटची किंमत 4999 युआन म्हणजे जवळपास 53,500 रुपये आहे. तसेच फोनचा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 4399 युआन म्हणजे जवळपास 47,000 रुपये तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 3799 युआन जवळपास 40,000 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.
















